Amitabh Bachchan Dance Video: ५ एप्रिल २०२६ ला चेतक स्क्रीन अवॉर्ड्स हा सोहळा पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्याची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुरस्कार सोहळ्यांमध्ये उत्तमोत्तम चित्रपटांचे कौतुक होते. कलाकारांना त्यांच्या कामासाठी गौरविले जाते. त्या-त्या वर्षातील प्रदर्शित झालेल्या सिनेमांबद्दल बोलले जाते. याबरोबरच अनेक कलाकार सादरीकरण करतात. अनेक किस्सेही सांगितले जातात. तसेच लोकप्रिय कलाकारांना प्रत्यक्षात परफॉर्म करताना पाहण्यासाठी इतर कलाकारही उत्सुक असतात.

२०१० मध्ये पार पडलेल्या स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात असेच काहीसे घडले होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन शाहरुख खान आणि शाहिद कपूर यांनी केले होते.

Award Banner

प्रियांका चोप्रा व शाहिद कपूर रिलेशनशिपमध्ये होते?

त्यांनी जोडी नंबर १ या पुरस्काराची घोषणा केली. या पुरस्कारासाठी अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन, रणबीर कपूर व कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा व शाहिद कपूर या जोड्या नॉमिनेट होत्या. प्रियांकाचे नाव घेताना शाहरुखने शाहिदला चिडवले, त्याचे कारण म्हणजे ‘कमीने’ या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. या दोन्ही कलाकारांनी याबद्दल कधीच खुलासा केला नाही. जेव्हा प्रियांकाच्या घरावर आयकर विभागाची रेड पडली होती, त्यावेळी शाहिद तिथे उपस्थित होता. या प्रसंगानंतरही त्यांच्या नात्याची मोठी चर्चा झाली. दोन वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केल्याचे म्हटले जाते. जेव्हा ते नात्यातून बाहेर पडले, त्यानंतरही त्यांनी व्यावसायिकदृष्ट्या एकमेकांशी चांगले नाते ठेवले.

शाहरुख खानने अमिताभ बच्चन यांना करायला लावलेला डान्स

जेव्हा शाहरुख शाहिदला चिडवत होता, त्यावेळी प्रियांकाने त्याला लाजत थांबवण्याचा प्रयत्न केला. २०१० ला पार पडलेल्या स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांनी जोडी नंबर १ हा पुरस्कार जिंकला होता, त्यानंतर अभिषेक बच्चन व अमिताभ बच्चन यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले होते, त्यांनी त्यांच्या टीमचे कौतुक केले होते.

त्यानंतर शाहरुख खानने अमिताभ बच्चन यांना ‘पा’ सिनेमात ते जसे डान्स करतात, तसा डान्स करण्याची विनंती केली. त्यानंतर जमलेल्या कलाकारांनी, प्रेक्षकांनी शिट्ट्या वाजवल्या. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी डान्स केला. त्यानंतर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

दरम्यान, शाहरुख खान लवकरच ‘द किंग’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर अभिषेक बच्चनदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच, सुहाना खान व अर्शद वारसीदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.