scorecardresearch

“माझ्या किसिंग सीनचा व्हिडीओ मुलाने पाहिला अन्…” लेकालाच मुर्ख म्हणत ट्विंकल खन्नाचा खुलासा

जान चित्रपटात ट्विंकल खन्नाने अजय देवगणसह मुख्य भूमिका साकारली होती.

“माझ्या किसिंग सीनचा व्हिडीओ मुलाने पाहिला अन्…” लेकालाच मुर्ख म्हणत ट्विंकल खन्नाचा खुलासा
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री ट्विंकल खन्ना आता लेखिका झाली आहे. ट्विंकल गेल्या २० वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. तिने १९९५ साली ‘बरसात’ चित्रपटात बॉबी देओलबरोबर अभिनय करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिने ‘मेला’ आणि ‘इतिहास’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. २००१नंतर तिने चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं.

दरम्यान, २०१५ मध्ये मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत ट्विंकलने तिचा मुलगा देखील तिच्या चित्रपटांची खिल्ली उडवतो, असं म्हटलं होतं. ट्विंकल आणि तिचा पती अभिनेता अक्षय कुमार यांना मुलगी नितारा आणि मुलगा आरव ही दोन अपत्ये आहेत. ट्विंकल म्हणाली, “मी माझ्या मुलांना माझे चित्रपट पाहू देत नाही. ‘जान’ चित्रपटामध्ये एक सीन आहे. जिथे मी अजय देवगणच्या छातीचे चुंबन घेत असते. एकदा माझा मुलगा तोच सीन पुन्हा पुन्हा पाहत होता. एकदा तर माझ्या मुलाने माझ्या वाढदिवसासाठी या व्हिडीओचा कोलाज बनवला. तो खरंच मूर्ख आहे!”

हेही वाचा – ‘काश्मीर फाइल्स’वरील वक्तव्यानंतर नदाव लॅपिडच्या विकिपीडिया पेजवर आक्षेपार्ह बदल, लिहिलं “डाव्या विचारसरणीचे…”

ती पुढे उपहासात्मक म्हणाली, “मला वाटत नाही की माझ्या या ‘उत्कृष्ट’ फिल्मी करिअरला माझ्या कुटुंबाचं फारसं समर्थन आहे. नोकरी आणि करिअर यात फरक आहे. मला अभिनय करणं फारसं आवडायचं नाही. मला फक्त घरी परत जाऊन पुस्तकं वाचायची होती. कधी कधी मी सेटवर बसून विणकाम करायचे आणि त्यावेळी स्पॉट बॉय येऊन म्हणायचा, ‘आप मत करिये, सब आंटी जी बोलेंगे’”, अशी आठवण तिने सांगितली होती.

हेही वाचा – ‘काश्मीर फाइल्स’ अप्रतिम सिनेमा, पण प्रोपगंडाच! राजकीय दबावामुळे इफ्फीत समावेश – नदाव लॅपिड

राज कंवर दिग्दर्शित ‘जान’ चित्रपट १९९६ मध्ये रिलीज झाला आणि त्यात अजय देवगण मुख्य भूमिकेत होता. ट्विंकलचा शेवटचा चित्रपट २००१ साली आलेला ‘लव्ह के लिए कुछ भी करेगा’ होता. त्यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम केलं नाही. तिला पुस्तकं खूप आवडायची, त्यामुळे तिने चित्रपटसृष्टीला रामराम करत लेखिका म्हणून करिअर केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 16:48 IST

संबंधित बातम्या