सलमान खानचे भाऊ सोहेल आणि अरबाज खान खूप लोकप्रिय आहेत. दोघेही लोकप्रिय अभिनेते आहेत. अरबाज चित्रपट निर्माताही आहे. सोहेल व अरबाज यांनी अरबाजचा मुलगा अरहान आणि त्याच्या मित्रांनी होस्ट केलेल्या ‘डंब बिर्याणी’ या नवीन वेब शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या अपयशाबद्दल विधान केलं.

अरबाज आणि सोहेल दोघांचेही घटस्फोट झाले आहेत. काही लग्नं का मोडतात, याबाबत त्यांनी त्यांची मतं मांडली. जेव्हा आपण नात्याती उत्साह गमावतो समजदारीने आयुष्यात पुढे जाणं आवश्यक आहे, असं सोहेलला वाटतं. तर अरबाजच्या मते कोणतंही नातं केवळ एका व्यक्तीभोवती फिरणारं नसावं. प्रत्येक नातं एका एक्सपायरी डेटसह येतं, असं सोहेलने म्हटलं.

दिव्या भारतीने निधनाआधी दारू प्यायली होती, अभिनेता कमल सदानाचे विधान; म्हणाला, “आम्ही एकत्र शूटिंग…”

“तुमचं किंवा तुमच्या जोडीदाराचं काय होईल हे दडपण नात्यात आपल्यावर येतं. हे दडपण कायमच असतं. ते नातं संपेपर्यंत हे दडपण असतं. जोपर्यंत तुम्ही एकत्र आनंदी आहात तोवर त्यात कटुता येऊ देऊ नका. कारण तेव्हाच तुमच्या मनात जोडीदाराबद्दल नकारात्मक भावना येऊ लागतात. प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी असते. अगदी औषधं, चॉकलेट, अन्न सर्वांचीच. तुमच्या नात्यातला उत्साह संपला की तुम्ही समजुतदारपण पुढे जा. यासाठी संवाद खूप महत्त्वाचा आहे. ब्रेकअपनंतर एखाद्याचा इगो दुखावणं हे साहजिक आहे,” असं सोहेल म्हणाला.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट प्रदर्शित होऊन २० दिवस पूर्ण, एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या

अरबाज म्हणाला, “नात्यात येण्याची योग्य वेळ म्हणजे तुम्हाला त्यातून काय मिळतंय हा विचार न करता तुम्ही देण्यास तयार असता. काही जण नात्यातून काहीतरी हवंय या हेतूने येतात आणि मग विसरतात की त्यांनाही या नात्यात काहीतरी द्यावं लागेल. तुम्ही रिलेशनशिपमध्ये का आहात, यासाठी कारण असावं लागतं. जर नातं एकतर्फी असेल तर ते एका ठराविक काळानंतर टिकणार नाही. नात्यात संवाद महत्त्वाचा असतो.” यावेळी त्याने निकाहचं महत्त्व सांगितलं. “तुम्ही एका पेपरवर सही करता आणि म्हणता की तुम्ही तुमच्या जोडीदाराची काळजी घ्याल,” असं अरबाज म्हणाला. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मित्रांप्रमाणे संवाद साधू शकलात तर ते नातं जास्त काळ टिकण्याची संधी असते, असं अरबाजला वाटतं.

“ते आधीच विवाहित होते,” लग्न गुपित ठेवण्याबद्दल अरुणा इराणींचा खुलासा; मूल होऊ न देण्याबाबत म्हणाल्या, “तो निर्णय…”

दरम्यान, सोहेल खानबद्दल बोलायचं झाल्यास त्याचं १९९८ मध्ये सीमा सजदेहशी लग्न झालं होतं. ते २०२२ मध्ये विभक्त झाले. त्यांना निर्वाण आणि योहान अशी दोन मुलं आहेत. तर, अरबाजने मलायका अरोराशी लग्न केलं होतं, ते २०१७ मध्ये विभक्त झाले. त्याने शुरा खानशी २०२३ मध्ये दुसरं लग्न केलं. अरबाजला मलायकापासून अरहान नावाचा मुलगा आहे.