बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते, ही-मॅन धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. हेमा मालिनी यांना पतीच्या निधनाचा मोठा धक्का बसला आहे. मुलगी ईशा व अहाना देओल आईला धीर देत आहेत. या कठीण काळात सावलीसारख्या आईबरोबर आहेत. इतकंच नाही तर ईशा देओलचा एक्स पती व अहाना देओलचा पती त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे आहेत.

धर्मेंद्र व हेमा मालिनी यांना दोन मुली आहेत. त्यापैकी ईशा देओल थोरली तर अहाना धाकटी आहे. ईशा देओलने २०१२ मध्ये भरत तख्तानीशी लग्न केलं होतं, पण २०२४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेला भरत तख्तानी आला होता. त्याचबरोबर अहाना देओलचा पती वैभव वोहरा देखील आला होता.

अहाना देओलने फक्त एक चित्रपट केला होता, आता ती फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय नाही. अहानाने २०१४ मध्ये तिचा प्रियकर वैभव वोहराशी लग्न केलं. वैभव वोहरा बिझनेसमन आहे. त्याचा फिल्म इंडस्ट्रीशी काही संबंध नाही. पण वैभवच्या लूकबद्दल बोलायचं झाल्यास तो हिरोइतकाच हँडसम दिसतो.

Award Banner

कोण आहे वैभव वोहरा?

Who is Vaibhav Vohra: वैभव वोहरा हा दिल्लीत राहणारा एक उद्योजक आहे. तो सिंगापूर एअरलाइन्स, एअर फ्रान्स, लुफ्थांसा आणि एअर कॅनडा सारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठी फ्रेट फॉरवर्डिंग एजंट असलेल्या कॉन्टिनेंटल कॅरियर्स प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक आहे. वैभवने बॅबसन कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे. तो लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन क्षेत्रात काम करतो आणि इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्समध्ये देखील सक्रिय आहे.

ahana deol husband vaibhav vohra (2)
ईशा देओलने शेअर केलेला वैभव वोहरा व अहाना देओलबरोबरचा फोटो (सौजन्य – इन्स्टाग्राम)

अहाना देओल व वैभव वोहराची पहिली भेट

Ahana Deol Vaibhav Vohra first meeting : वैभव वोहरा व अहाना देओल यांची पहिली भेट ईशा देओलच्या लग्नात झाली होती. ईशा देओल व भरत तख्तानीच्या लग्नातच अहाना-वैभव भेटले होते. दोघांची ओळख झाली आणि नंतर ते डेट करू लागले. प्रेमात पडल्यावर काही वर्षे डेटिंग केल्यानंतर, अहाना आणि वैभवने २ फेब्रुवारी २०१४ रोजी मुंबईतील आयटीसी मराठा येथे लग्न केलं. त्यांचे लग्न तमिळ आणि पंजाबी रितीरिवाजांनुसार पार पडलं. लग्नानंतर एका वर्षाने, त्यांनी त्यांचा मुलगा डेरियन वोहरा याचं स्वागत केलं. त्यानंतर २०२० मध्ये आहाना देओलला अॅस्ट्रिया आणि एडिया वोहरा या जुळ्या मुली झाल्या. सध्या अहाना मुलांचा सांभाळ करते आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवते.