Who Is Komal Rani Swarnkar: गोविंदा अलीकडे विविध कारणांमुळे चर्चेत आहे. नुकतीच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने केलेली वक्तव्ये सध्या चर्चेत आहेत. त्याने पत्नी सुनीता आहुजाने केलेल्या चिटिंगच्या आरोपांवर वक्तव्य केले आहे. याबरोबरच डेव्हिड धवन यांच्याबरोबर १७ सिनेमांत काम केल्यानंतर पुन्हा त्यांच्याबरोबर का काम केले नाही, यावरही गोविंदाने खुलासा केला आहे. याबरोबरच सिनेमांतील हिरोईनबरोबर त्याचे कसे संबंध होते, यावरही त्याने वक्तव्य केले आहे.
कोण आहे कोमल राणी स्वर्णकार?
आता या सगळ्यात गोविंदाचे नाव कोमल राणी स्वर्णकारबरोबर जोडले जात आहे. आता कोमल कोण आहे, ती काय करते याबद्दल जाणून घेऊ…
कोमल आणि गोविंदा काही दिवसांपूर्वी एकत्र दिसले होते, त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सुरू आहे. ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, गोविंदा किंवा कोमल यांच्यापैकी कोणीही याबाबत वक्तव्य केले नाही.
कोमलच्या कामाबद्दल बोलायचे तर सध्या ती अभिनय क्षेत्रात काम करते. लवकरच ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. गोविंदाच्या रूपा या सिनेमात ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. काही रिपोर्टनुसार कोमल ही उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. कोमलच्या खासगी आयुष्याबद्दल, तिच्या शिक्षणाबद्दल किंवा कुटुंबाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. याबरोबरच तिचे वय किती आहे याबद्दलही कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
गोविंदाबरोबर नाव जोडले गेल्यामुळे कोमल सध्या चर्चेत आली आहे. तिच्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहेत. गोविंदा ७ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. रूपा या सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदाने पत्रकार परिषद घेत याबद्दल माहिती दिली होती. तसेच, युवा पिढीला प्रेरणा देणारा हा सिनेमा असेल असे तो म्हणाला होता. रूपा या सिनेमाबरोबरच तो दुनियादारी या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमातही गोविंदाबरोबर कोमल दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.
गोविंदा व कोमल नुकतेच मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली. गोविंदाच्या पत्नीने या चर्चांवर उत्तर देत, विनाशकाले विपरीतबुद्धि असे म्हटले. दरम्यान, गोविंदा किंवा कोमल या चर्चांवर काही उत्तर देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
