Who is Shahida Ansari: सोशल मीडिया असे माध्यम आहे, ज्याचा वापर जवळजवळ सर्वजण करतात. काहीजण हे मनोरंजनासाठी वापरतात, काहीजण याचा वापर कंटेंट क्रिएशन, बिझनेस, विनोदी रील्स अशा अनेक गोष्टींसाठी शेअर करतात. या माध्यमामुळेच आज अनेकजण इन्फ्लुएन्सर म्हणून लोकप्रिय ठरले आहेत. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

शाहिदा अन्सारी कोण आहेत?

शाहिदा अन्सारी यांचे काही व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्या मुंबईत राहतात. त्या नियमितपणे इन्स्टाग्राम व यूट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करतात. कंटेंट क्रिएटर म्हणून त्यांना ओळखले जाते.

आता बॉलीवूडची लोकप्रिय कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानने नुकतीच शाहिदा अन्सारीची भेट घेतली. याचा व्हिडीओ तिने तिच्या यूट्यूबवर शेअर केला. फराह तिचा कूक दिलीपसह शाहिदा यांच्या घरी गेली होती. मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या शाहिदा यांनी फराहला तिच्या कंटेंट क्रिएशनच्या प्रवासाबद्दल सांगितले.

Award Banner

आठ वर्षांपूर्वी सुरू केलेला कंटेट क्रिएशनचा प्रवास

त्यांनी सांगितले की, मी आठ वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करायला सुरुवात केली होती. अलीकडेच माझे काही रील्स व्हायरल झाले आहेत. माझे इन्स्टाग्रामवर दहा लाख फॉलोअर्स आहेत. तसेच शाहिदा यांनी एका छोट्या खोलीचं घरही फराह खानला दाखवले. त्यानंतर फराहने तिला विचारले की या खोलीत किती लोक राहतात? त्यावर त्यांनी दहा जण तिथे राहत असल्याचे सांगितले.

शाहिदा यांनी फराहशी बोलताना असेही सांगितले की, जेव्हा मी काही रील्स बनवत असते, कंटेट क्रिएट करत असते, तेव्हा इथे राहणारे झोपडपट्टीतील लोक मला पाठिंबा देतात. ते मला खूप आवडते.

शाहिदा अनेकदा त्यांच्या मुलांबरोबर जेवण बनवतानाचे व्हि़डीओ शेअर करतात, ज्यामध्ये ते एकमेकांची चेष्टा करताना दिसतात. त्यांचे ‘माय लाइफ, माय रूल्स’ हे रील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. शाहिदा दर रविवारी विनोदी रील्स पोस्ट करतात. चाहतेदेखील तिच्या रील्सला पसंती दाखवताना दिसतात.

शाहिदा यांनी फराहसाठी बटाट्याची भाजी बनवली होती. फराह आणि दिलीपने शाहिदा आणि तिच्या पतीबरोबर जेवण केले. फराहने शाहिदाच्या स्वयंपाकाचं कौतुक केले. तसेच ती कॅमेरासमोर खूप सहजतेने वावरते असेही सांगितले.

शाहिदा यांनी तिच्या यूट्यूब चॅनेलवर फराह खानबरोबरचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. फराह तिच्या घरी आली आणि तिची साधी रेसिपी तिला आवडली, याचा त्यांनी आनंद व्यक्त केला.