Karisma Kapur Ex Husband Sunjay Kapur : करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती आणि सोना स्टारचा चेअरमन संजय कपूरचे १२ जूनच्या रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो ५३ वर्षांचा होता. संजयच्या जाण्याने संजय आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. करिश्मा व संजयचा घटस्फोट झाला असला तरी, मुलं संजयच्या खूप जवळ होती. संजयच्या निधनानंतर करीना कपूर, सैफ अली खान, अमृता अरोरा व मलायका अरोरा तिच्या घरी पोहोचले आहेत.

संजय कपूर इंग्लंडमध्ये पोलो खेळत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याचे बिझनेस कन्सल्टंट सुहेल सेठ यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, संजयच्या तोंडात एक माशी शिरली होती, त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टर त्याला वाचवू शकले नाही.

संजय कपूरला पोलोची होती आवड

संजय कपूरला पोलो खेळण्याची खूप आवड होती. तो अनेकदा पोलो खेळताना आणि घोड्यांबरोबर वेळ घालवताना दिसायचा. पोलो खेळताना संजयला आपला जीव गमवावा लागला. संजय कपूरने उद्योगविश्वात मोठं नाव कमावलं होतं.पण तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत राहिला.

संजय कपूरची ३ लग्नं, ४ मुलं अन् घटस्फोट

संजय कपूरने ३ लग्नं केली. त्याचं पहिलं लग्न डिझायनर नंदिता महतानीशी झालं होते. पण २००० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००३ मध्ये संजय कपूरने अभिनेत्री करिश्मा कपूरशी लग्न केलं आणि त्यांना समायरा व कियान ही दोन अपत्ये झाली. त्यानंतर करिश्माने २०१४ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आणि २०१६ मध्ये ते कायदेशीररित्या विभक्त झाले. करिश्मा आणि संजय यांच्या लग्नाला संपूर्ण बॉलीवूड उपस्थित होतं, त्यामुळे जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलांच्या कस्टडीसाठी लढा आणि संजयचं तिसरं लग्न

संजयकडून मुलांची कस्टडी मिळावी यासाठी करिश्माने न्यायालयात लढा दिला. त्यानंतर मुलगा कियान आणि मुलगी समायरा दोघेही करिश्माबरोबर राहू लागले, पण ते संजयलाही भेटत असत. संजय आणि करिश्मा एकत्र मुलांचे संगोपन करत होते. करिश्मापासून घटस्फोट घेतल्यानंतर एका वर्षानंतर, संजय पुन्हा प्रेमात पडला आणि त्याने तिसरं लग्न केलं. संजयच्या तिसऱ्या बायकोचं नाव प्रिया सचदेव आहे. संजय व प्रिया २०१८ मध्ये एका मुलाचे आई-बाबा झाले. प्रियाला तिच्या पहिल्या लग्नापासून सफिरा चटवाल नावाची मुलगी आहे.