who was Amitabh Bachchan’s first girlfriend: अमिताभ बच्चन हे त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांच्या रिलेशनशिपबद्दल आजही बोलले जाते. रेखा आणि त्यांच्या नात्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते. पण, रेखा किंवा जया बच्चन यांच्या आधी त्यांच्या आयुष्यात एक मुलगी होती.
“त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम…”
प्रसिद्ध लेखक हनिफ झवेरी यांनी ‘मेरी सहेली’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत हनिफ झवेरी यांनी बिग बींचे पहिले प्रेम कोण होते, याचा खुलासा केला.
हनिफ झवेरी म्हणालेले, “अमिताभ बच्चन यांनी त्यावेळी अभिनय क्षेत्रात पाऊलही ठेवलं नव्हतं. ते कोलकातामध्ये काम करीत होते. तेव्हा ते एका मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. ते एका कंपनीत काम करायचे. ब्रिटिश एअरवेज, असं या कंपनीचं नाव होतं. त्यांना २५०-३०० रुपये मिळायचे. त्याच दरम्यान त्यांच्या आयुष्यात माया नावाची एक मुलगी आली. त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. ते एकमेकांना भेटायचे.”
ते पुढे म्हणालेले, “अमिताभ बच्चन कालातरांने त्यांचं अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आले. त्यानंतर त्या दोघांनाही कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. जेव्हा ते मुंबईत आले तेव्हा ते त्यांच्या आई तेजा बच्चन यांच्या जवळच्या मित्राच्या घरी वास्तव्यास होते. तिथे त्यांना माया भेटण्यासाठी येत असे. अमिताभ बच्चन यांना भीती वाटली की, त्यांच्या आईला मायाबद्दल माहीत होईल. त्यामुळे त्यांनी ते घर सोडले. त्यावेळी ते अन्वर अली यांच्या सात हिंदुस्तानी या चित्रपटात काम करीत होते. त्यांनी त्यांच्या राहण्याची समस्या अन्वर अली यांना सांगितली. अन्वर अली यांनी मेहबूब अली यांच्या घरात त्यांना राहण्यासाठी जागा दिली. माया व अमिताभ बच्चन यांचे नातं चांगलं होतं; मात्र ते टिकू शकलं नाही.”
ते असेही म्हणालेले, “अमिताभ बच्चन त्यावेळी खूप लाजाळू होते; तर माया खूप बोल्ड होती. त्यांच्या दोघांच्या व्यक्तिमत्त्वात खूप फरक होता. अन्वर अली यांनी अमिताभ बच्चन यांना वेगळे होण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मतानुसार, त्या दोघांच्या व्यक्तिमत्त्वात खूप फरक असून, बच्चन कुटुंबात माया राहू शकणार नाही. अमिताभ बच्चन यांना जेव्हा त्यांच्यात व मायामध्ये खूप फरक असल्याचं जाणवलं तेव्हा त्यांनी मायापासून हळूहळू दूर राहण्यास सुरुवात केली. कालातरांने दोघांनी हे नातं संपवलं.”
दरम्यान, रेखा व अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दलही अनेकदा बोलले जाते. जया बच्चन व अमिताभ बच्चन यांनी ३ जून १९७३ रोजी लग्नगाठ बांधली.
