scorecardresearch

सोहेल खानच्या घरी का झाली अलाना पांडेची मेहेंदी सेरेमनी? अनन्या पांडेचे काका आणि सलमानच्या भावाचं नातं काय?

पांडे कुटुंबाच्या लेकीच्या लग्नाचे फंक्शन्स सोहेल खानच्या घरी का होत आहेत, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. त्याबद्दल जाणून घ्या.

alana pandey
(फोटो – इन्स्टाग्राम)

अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाआधीच्या फंक्शन्सना सुरुवात झाली आहे. मंगळवारी अलानाचा मेहेंदी कार्यक्रम होता. हा कार्यक्रम अभिनेता सोहेल खानच्या घरी आयोजित करण्यात होता. आता पांडे कुटुंबाच्या लेकीच्या लग्नाचे फंक्शन्स सोहेल खानच्या घरी का होत आहेत, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.

फक्त तबूबरोबर जास्त चित्रपट का करत आहेस? चाहत्याच्या प्रश्नाला अजय देवगणने दिलं उत्तर; म्हणाला, “तिच्या…”

चिक्की पांडे आणि डॅनी पांडे यांची मुलगी अलाना पांडेच्या लग्नापूर्वीचे विधी अभिनेता सोहेल खानच्या घरी ठेवण्यात आले आहेत. ती लवकरच तिचा बॉयफ्रेंड आयव्हर मॅक्रेशी लग्नगाठ बांधणार आहे. मंगळवारी मेहेंदी सेरेमनीसाठी अनेक बॉलिवूड कलाकार आणि पांडे कुटुंब सोहेल खानच्या घरी पोहोचले.

अलाना पांडेने तिच्या मेहेंदीमध्ये फ्लॉवरी लेहेंगा घातला होता आणि ती तिच्या आईबरोबर सोहेलच्या घरी पोहोचले. तिने होणारा पती मॅक्रेबरोबर कपड्यांचं ट्विनींग केलं होतं. या खास प्रसंगी अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपही पोहोचली होती. सलमानची आई सलमा खान, हेलन, अनन्या पांडे, भावना पांडे आणि इतर पाहुणेही या कार्यक्रमाला आले होते.

‘नाटू नाटू’ला Oscar मिळाल्याची जॅकलिन फर्नांडिसच्या मेकअप आर्टिस्टने उडवली खिल्ली; म्हणाला, “पैसे असतील तर काहीही…”

दरम्यान, चिक्की पांडे आणि सोहेल खान खूप जवळचे मित्र आहेत, त्यामुळे सोहेलच्या घरी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असं ‘नवभारत टाइम्स’ने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 08:59 IST