अभिनेत्री अरुणा इराणी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे. ‘रोटी कपडा और मकान’, ‘रॉकी’, ‘लव्ह स्टोरी’, ‘बेटा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कुकू कोहली व त्यांची लव्ह स्टोरी सांगितली. कुकू विवाहित आहेत हे माहित असूनही आपण त्यांच्या प्रेमात पडलो, असं त्यांनी सांगितलं. लग्नानंतर या जोडप्याने मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांनी माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘झूम’ शी बोलताना अरुणा इराणींनी सांगितलं त्या आणि कुकू कोहली आधी एकमेकांचा तिरस्कार करायचे. “’कोहराम’ सिनेमा करताना मी कुकुजींना भेटले. तेव्हा मी घर चालवण्यासाठी खूप चित्रपट करत होते पण त्या फारशा चांगल्या भूमिका नव्हत्या. मी मद्रासमध्ये माझ्या चित्रपटांमध्ये खूप व्यग्र होते. त्या वेळी कुकुजींनी मला माझ्या एका महिन्याच्या तारखा विचारल्या, पण मी त्यांना सांगितलं की मी चित्रपट करू शकत नाही. कुकुजी रागावले, पण आम्ही एकत्र काम करत राहिलो. मी नकार दिल्याने काहीवेळा माझं काम नसतानाही ते मला फोन करून सेटवर बोलवायचे त्यामुळे मला खूप राग यायचा.”

प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

त्या पुढे म्हणाल्या, “कधीकधी ते मला दिवसभर सेटवर बसवून ठेवायचे आणि मग एक शॉट घ्यायचे, त्यामुळे आमच्यात भांडणं व्हायची. मला कुकूजी अजिबात आवडायचे नाही आणि त्यांनाही माझा राग होताच. पण नंतर काय झालं कुणास ठाऊक ते माझ्याशी नम्रपणे वागू लागले, मग आम्ही मित्र झालो. मग त्यांनी माझ्या तारखा अॅडजस्ट करायला सुरुवात केली आणि याचदरम्यान आम्ही प्रेमात पडलो.”

विनयभंगाच्या सीनआधी खूप रडली होती माधुरी दीक्षित, काम करण्यास दिलेला नकार; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली आठवण

लग्नाची माहिती लपवून ठेवण्याचा आणि मुलं होऊ न देण्याचा निर्णय का घेतला, असं अरुणांना विचारण्यात आलं. “मी आमच्या लग्नाबद्दल कोणालाही सांगितलं नाही कारण ते आधीच विवाहित होते. मला त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल माहिती नव्हती, असं म्हटलं गेलं, पण तसं नाही. त्यांची पत्नी मुलांसह सेटवर यायची. मला ते विवाहित आहेत हे माहित होतं. अशा परिस्थितीत लग्नाचा निर्णय घेणं कठीण होतं. कसंतरी आमचं लग्न झालं. मुलं जन्माला न घालणं हा आमच्यासाठी योग्य निर्णय नव्हता. पण माझ्याशी लग्न करण्यासाठी ते सर्वांशी भांडले,” असं अरुणा कुकू कोहलींबद्दल म्हणाल्या.

पती फोटोग्राफर तर सासरे मंत्री, स्वत: राजकुमारी असलेली अभिनेत्री अभिनय सोडून रमली संसारात, पाहा Photos

‘रॉकी’मध्ये त्यांना संजय दत्तच्या आईची भूमिका करायची नव्हती, असं अरुणा यांनी सांगितलं. “मला इतक्या कमी वयात पडद्यावर आईची भूमिका करायची नव्हती. मी कदाचित माझ्या तिशीत होते, तेव्हा ही भूमिका केली होती, पण दत्त साहेब (सुनिल दत्त) खूप जिद्दी होते,त्यांनी मला ही भूमिका करायला लावली,” असं त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why aruna irani kept her marriage secret with kuku kohli she talked about not having babies hrc
First published on: 08-04-2024 at 08:32 IST