scorecardresearch

Premium

परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांनी लग्नासाठी उदयपूरचीच का निवड केली? ‘या’ व्यक्तीने सुचवलं होतं नाव

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा शाही लग्नसोहळाच्या विधींना सुरुवात

Parineeti Chopra and Raghav Chadha
परिणीती चोप्रा व राघवने लग्नासाठी उदयपूरचीच का निवड केली

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा आज लग्नबंधनात अडकणार आहेत. उदयपूरच्या द लीला पॅलेसमध्ये आज हा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पण परिणीती आणि राघव यांनी लग्नासाठी उदयपूरचीच का निवड केली? घ्या जाणून

हेही वाचा- Video: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा कुटुंबियांसह पोहोचले उदयपूरला, विमानतळावर झालं खास स्वागत

Prarthana-Behere-1
“मी प्रेग्नंट…,” प्रार्थना बेहेरेने केला खुलासा, म्हणाली, “मध्यंतरी एक…”
Actor Sagar Karand Suresh Wadkar
Video: सागर कारंडे बऱ्याच काळानंतर दिसला पोस्टमनच्या भूमिकेत, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर घेऊन आला सुरेश वाडकरांसाठी पत्र
Parineeti Chopra-Raghav Chadha wedding menu
राघव चड्ढा-परिणीती चोप्राच्या लग्नात कोणत्या प्रकारचं जेवण असणार? अभिनेत्रीने स्वतः ठरवलाय खास मेन्यू
raveena tandon grandson birthday
“माझ्या प्रिय बाळाच्या बाळाला…”, नातवासाठी आजी रवीना टंडनची खास पोस्ट; गोंडस फोटो केले शेअर

लग्न कुठे करायचं यासाठी परिणीती आणि राघव यांनी अनेकाशी चर्चा केली. आम आदमी पक्षाचे नेते विक्रमजीत सिंह साहनी यांनी परिणीती आणि राघव यांना लग्नासाठी उदयपूरचे नाव सुचवले होते. लग्नानंतर विक्रमजीत हनीमूनसाठी उदयपूरला आले होते. त्याना हे शहर खूप आवडलं होतं. त्यामुळे त्यांनी परिणीती आणि राघव यांना या शहरात लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यांचा सल्ला मानत दोघांनी उदयपूरमध्येच लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान परिणीती आणि राघव यांच्या लग्नसाठी राजकीय मंडळी तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दोघं आपल्या पत्नीसह काल उदयपूरमध्ये दाखल झाले.

हेही वाचा- परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या संगीत सोहळ्यातला व्हिडीओ व्हायरल; नवराज हंसच्या गाण्यावर पाहुण्यांचा जबरदस्त डान्स

दरम्यान, १३ मे २०२३ला परिणीती आणि राघव यांनी साखरपुडा करत सगळ्यांनाच सुखद धक्का दिला होता. दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी परिणीती व राघव यांचा थाटामाटात साखरपुडा पार पडला होता. तेव्हापासून दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. दोघांच्या लग्नाच्या तारेखबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why did parineeti chopra and raghav chadha choose udaipur for their wedding dpj

First published on: 24-09-2023 at 17:13 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×