scorecardresearch

सलमान खान आणि संगीता बिजलानीचे लग्न का मोडलं? खरं कारण आलं समोर

जवळपास १० वर्ष ते एकमेकांना डेट करत असल्याचे बोललं जातं.

सलमान खान आणि संगीता बिजलानीचे लग्न का मोडलं? खरं कारण आलं समोर
सलमान खान संगीता बिजलानी

बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खानला बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखले जाते. नुकतच सलमानने त्याचा ५७ वा वाढदिवस दणक्यात साजरा केला. याच पार्टीतील एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. सलमान खान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड-अभिनेत्री संगीता बिजलानी यांचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत सलमान खानने संगीता बिजलानीला मिठी मारली, तिच्या कपाळावर किस केली आणि याबद्दलची चर्चा सर्वत्र रंगली. यानंतर पुन्हा एकदा ते दोघांच्या नात्याबद्दल चर्चा रंगू लागल्या.

सलमान खानने काही दिवसांपूर्वीच त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी शाहरुख खान, कार्तिक आर्यन, पूजा हेगडे, रितेश जिनिलिया, तब्बू यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी झाले होते. सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीही त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी पोहोचली होती. यावेळी सलमानने संगीता बिजलानीला मिठी मारली. तिच्या कपाळावर किस केली. त्यानंतर याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओवरुन त्यांच्याबद्दल अनेक रिलेशनशिपच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरु लागल्या आहेत.
आणखी वाचा : सलमान खानने शेअर केला शर्टलेस फोटो, संगीता बिजलानीची कमेंट चर्चेत

संगीता बिजलानी आणि सलमान खान यांनी १९८६ मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. जवळपास १० वर्ष ते एकमेकांना डेट करत असल्याचे बोललं जातं. या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा त्याकाळी बॉलिवूडमध्ये फार गाजल्या. विशेष म्हणजे संगीता बिजलानी आणि सलमान खान हे लग्नही करणार होते. इतकंच नव्हे तर त्यांच्या लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. पण ऐनवेळी दोघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांनी हा निर्णय का घेतला याबद्दलचे कारण समोर आले आहे.

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, “सलमान खान आणि संगीता बिजलानी हे दोघेही लग्न करणार होते. मात्र एक दिवस अचानक संगीता बिजलानीला सलमानच्या अफेअरबद्दल माहिती मिळाली. त्यावेळी सलमान हा सोमी अलीला डेट करत होता, असे म्हटलं जाते. संगीताला सोमी अली आणि सलमानच्या अफेअरबद्दल समजताच तिने त्याच्याबरोबरचे संबंध तोडून टाकले. त्याबरोबरच तिने लग्न करण्यासाठीही नकार दिला.”

आणखी वाचा : “अस्सल दादरकर, आठ वर्षांचे रिलेशनशिप, लग्न अन्…” ‘बिग बॉस’मुळे चर्चेत आलेल्या अपूर्वा नेमळेकरबद्दल माहितीये का?

संगीता बिजलानीने १९८० साली ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला. त्यानंतर तिने मॉडलिंगमध्ये करिअर सुरु केले. तिथून ती अभिनयाकडे वळली. संगीता बिजलानी आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. दरम्यान सलमान लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात झळकणार आहे. तसेच त्याच्या ‘टायगर ३’ चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटात तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 18:35 IST

संबंधित बातम्या