Will Akshay Kumar reprise his role as Raju in Hera Pheri 3 | Loksatta

‘हेरा फेरी ३’मध्ये अक्षय कुमार राजूच्या भूमिकेत परतणार? चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर

अक्षयच्या जागी कार्तिक आर्यनची लागली वर्णी, पण पुन्हा एकदा अक्षय परतणार असल्याच्या चर्चांना उधाण, निर्मात्यांनी भेट घेतल्याचीही माहिती

‘हेरा फेरी ३’मध्ये अक्षय कुमार राजूच्या भूमिकेत परतणार? चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर
(संग्रहित फोटो)

मागच्या काही दिवसांपासून ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटावर निर्माते व दिग्दर्शक काम करत असल्याचं कळतंय. पण, अशातच चित्रपटाबद्दल एक महत्त्वाची अपडेट आली होती. या चित्रपटात अक्षय नव्हे तर कार्तिक आर्यन मुख्य भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं होतं. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी आपल्या ट्विटरवर कार्तिक आर्यनच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं. दरम्यान, आता या चित्रपटात अक्षय कुमार परतणार असल्याचं कळतंय.

हेही वाचा – ‘मवाली’ चित्रपटातील ‘तो’ एक सीन अन् शक्ती कपूर यांनी बॉलिवूड सोडण्याचा घेतला होता निर्णय; आठवण सांगत म्हणाले…

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला चित्रपटात अक्षयला परत घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अक्षयने हेरा फेरी फ्रँचायझीमध्ये राजू म्हणून परत यावं, यासाठी त्याच्याशी चर्चा केली जात आहे. ‘पिंकव्हिला’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “कार्तिक आर्यनला ‘हेरा फेरी ३’ साठी कास्ट करण्यात आलंय. त्यांसदर्भातील सर्व कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाली आहे. पण अशातच आता पुन्हा बदल होत आहेत.”

हेही वाचा – “…ही नवीन ‘नग्नता’ आहे का?”; पंतप्रधान मोदींचे २० फोटो शेअर करत प्रकाश राज यांची पोस्ट

अहवालानुसार, गेल्या १० दिवसांत फिरोजने अक्षय कुमारबरोबरचे सर्व मतभेद दूर करण्यासाठी आणि त्याला फ्रँचायझीकडे परत आणण्यासाठी २ वेळा भेट घेतली आहे. अक्षयचं पात्र चित्रपटासाठी किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव फिरोजला आहे. त्यामुळे त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘हेरा फेरी’ हा एक असा चित्रपट आहे जो अक्षय कुमारशिवाय बनूच शकत नाही. म्हणूनच मूळ कलाकारांसह हिंदी चित्रपटातील सर्वात लोकप्रिय कॉमिक फ्रँचायझी तिसऱ्यांदा परत आणण्यासाठी निर्माते उत्सुक आहेत आणि सध्या त्यासाठी काम सुरू आहे.

हेही वाचा – आरोह वेलणकर विसरला स्वतःच्याच लग्नाची तारीख; म्हणाला,”लग्नानंतर दिवस…”

वृत्तानुसार, अक्षयनेही फिरोजबरोबर ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट बनवण्यासाठी स्वारस्य दाखवलं आहे. अक्षयने मानधनासाठी नाही, तर कथेमुळे चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पण अक्षयला परत आणण्यासाठी स्क्रिप्टमध्ये बदल केले जाणार असल्याचं कळतंय. लवकरच यासंदर्भातील घोषणा केली जाऊ शकते, असंही सूत्रांनी सांगितलंय.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 18:28 IST
Next Story
आमिर खानच्या मुलीनंतर बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लेकीने गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो व्हायरल