Will Dhurandhar 2 break Salaar record: रणवीर सिंहचा धुरंधर हा सिनेमा प्रचंड गाजला. रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. दीड महिन्याहून अधिक काळ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर राज्य केले. ५ डिसेंबर २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाची प्रदर्शित होण्याआधीपासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीला चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, मात्र त्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड मोडले. ‘धुरंधर’ हा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला; तर भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला.
धुरंधरने शाहरुख खानच्या ‘जवान’, ‘पठाण’, तसेच विकी कौशलचा गाजलेला ‘छावा’, याबरोबरच श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’ या सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. आता ‘धुरंधर’ नंतर धुरंधर २ ची सगळीकडे चर्चा सुरू आहे. १९ मार्च २०२६ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर १९ तारखेला पेड प्रीव्हयू पार पडणार आहे.
आता या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. कोईमोईच्या रिपोर्टनुसार पेड प्रीव्ह्यूमध्ये २५ कोटींचे कलेक्शन होईल, असा अंदाज लावला जाच आहे.तसेच ज्या दिवशी चित्रपट प्रदर्शित होईल त्या दिवशी हा सिनेमा १०० कोटींची कमाई करेल, असे म्हणले जात आहे. जर चित्रपटाने प्रदर्शित झाल्याच्या दिवशी १०० कोटींची कमाई केली. तर हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दिवशी १०० कोटींची कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरेल. हा विक्रम प्रभासच्या सालारच्या नावावर आहे.
पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट कोणते?
सालारने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ९०.७ कोटींची कमाई केली होती. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दे कॉल हिम ओजी(They Call Him OG) हा सिनेमा आहे. या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ९४.७ कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या क्रमांकावर कुली हा सिनेमा आहे. या चित्रपटाने ६५ कोटींची कमाई केली होती. चौथ्या क्रमांकावर अॅनिमल हा सिनेमा आहे. रणबीर कपूरच्या या चित्रपटाने ६३. ८ कोटींची कमाई केली आहे. तर पाचव्या क्रमांकावर धुंरधर आहे. धुरंधरने २८. ६ कोटींची कमाई केली आहे. सहाव्या क्रमांकावर हिट, सातव्या क्रमांकावर सत्यमेव जयते, आठव्या क्रमांकावर कबीर सिंग, नवव्या क्रमांकावर रायन आणि दहाव्या क्रमांकावर ग्रँड मस्ती हा चित्रपट आहे.
दरम्यान, नुकताच धुरंधर २ चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. रणवीर सिंह, सारा अर्जुन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन असे अनेक कलाकार महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
