scorecardresearch

Premium

शाहरुखच्या ‘डंकी’मध्ये भारत-कॅनडामधील तणावाचे संदर्भ असणार का? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

‘डंकी’ची कथा ही देश सोडून परदेशात स्थलांतरित झालेल्या लोकांवर बेतलेली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे

shahrukh-dunki
फोटो : इंडियन एक्सप्रेस

आधी ‘पठाण’ अन् आता ‘जवान’ अशा दोन्ही चित्रपटांच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा किंग खान शाहरुख खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. दोन्ही चित्रपटांनी १००० कोटींचा टप्पा पार केल्याने आता शाहरुखच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाकडून असणाऱ्या अपेक्षा वाढल्या आहेत. ‘डंकी’च्या माध्यमातून शाहरुख खान व राजकुमार हिरानी हे प्रथमच एकत्र काम करणार आहेत.

‘डंकी’ची कथा ही आपल्या देश सोडून परदेशात स्थलांतरित झालेल्या लोकांवर बेतलेली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतकंच नव्हे तर काही मीडिया रीपोर्टनुसार ‘डंकी’मध्ये नुकत्याच निर्माण झालेल्या भारत-कॅनडा य दोन देशांमधील तणाव दाखवला जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. गेले काही दिवस हा वाद सध्या चांगलाच चर्चेत आला असल्याने ‘डंकी’मध्ये त्याचे काही संदर्भ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Optical Illusion Photo
Optical Illusion: लोकांच्या गर्दीत लपून बसलाय एक प्राणी, एकदा क्लिक करून नीट पाहा…
Kiran Mane fb post
BMW च्या नेमप्लेटवर ‘जय भीम’ अन्…; किरण माने ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या fb फ्रेंडचा फोटो शेअर करत म्हणाले…
Extramarital affair
बॉयफ्रेंडबरोबर अश्लील चॅट करताना नवऱ्याने बायकोला रंगेहात पकडलं, उत्तर प्रदेशातील हायव्होल्टेज ड्रामा VIRAL
supriya-sule-khupte-tithe-gupte
‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर सुप्रिया सुळे झाल्या भावूक; नव्या एपिसोडचा प्रोमो चर्चेत

आणखी वाचा : आमिर खान उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकमधून कमबॅक करणार का? दिग्दर्शक अविनाश अरुण यांचा खुलासा

यामुळेच सोशल मीडियावर ‘डंकी’च्या कथेची जबरदस्त चर्चा होताना दिसत आहे. याउलट ‘इंडिया टूडे’ने दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट एक गंभीर मुद्द्यावर भाष्य करणारा असेल, इतकंच नव्हे तर यात भारत-कॅनडा यामधील वादाचा कोणताही संदर्भ नसेल असं स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता ‘डंकी’मध्ये भारत-कॅनडा मुद्द्याशी निगडीत काही पाहायला मिळेल की नाही ते चित्रपट आल्यावरच स्पष्ट होईल.

शाहरुखचे चाहते आणि सिनेप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. ‘डंकी’च्या बरोबरीनेच प्रभासचा ‘सालार’सुद्धा प्रदर्शित होणार आहे. यामुळे याचा फटका ‘डंकी’ला नक्कीच बसू शकतो त्यामुळे ‘डंकी’चे निर्माते सध्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल पुनर्विचार करत आहेत. ‘डंकी’मध्ये शाहरुखसह तापसी पन्नू, विकी कौशल यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Will shahrukh khan next film dunki address the current issue between india and canada avn

First published on: 02-10-2023 at 19:58 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×