Premium

“विवेक अग्निहोत्रीने नशेत माझ्याबरोबर…”, महिलेचा आरोप; कंगना रणौत उत्तर देत म्हणाली, “मला बरबाद…”

विवेक अग्निहोत्रींना पाठिंबा देणाऱ्या कंगनाचं ट्वीट रिट्वीट करत महिलेने केला आरोप, त्यावर कंगना काय म्हणाली? वाचा

woman alliegations on vivek agnihotri Kangana Ranaut reacts
कंगना रणौतने महिलेला नेमका काय रिप्लाय दिला? वाचा (फोटो – इन्स्टाग्राम व ट्वीटर स्क्रीनशॉट)

विवेक अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाची गेल्या तीन दिवसाची कमाई निराशाजनक राहिली. चित्रपटाने रविवारी २ कोटी रुपयांची कमाई केली. चार दिवसात हा सिनेमा केवळ ५.७० कोटी रुपये कमवू शकला आहे. अशातच या चित्रपटाच्या निराशाजनक कामगिरी सांगणाऱ्या एका ट्वीटवर कंगना रणौतने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“लोक धक्के देत होते, ढकलत होते”, फराह खानने लालबागचा राजाच्या दर्शनाला गेल्यावरचा अनुभव, म्हणाली, “मला फक्त…”

“तुला चित्रपटाबद्दल इतकं वाईट का लिहायचं असतं? यश म्हणजे फक्त पैसा आहे का? सगळ्या कलाकारांचा असा अपमान का करता? प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांपैकी द व्हॅक्सिन वॉरला सर्वोत्कृष्ट रिव्ह्यू मिळाले, एक चांगला बनवलेला चित्रपट यशस्वी नाही का? सर्व व्यवसाय नेहमी नफा शोधतात का? काही प्रयत्न यशस्वी होतात तर काही नाही. तुमच्या सारख्या लोकांना लाज वाटली पाहिजे. तुमच्यासारखा कोणीतरी जो घरी बसला आहे आणि ज्याला चित्रपटांचा ‘एफ’ देखील माहीत नाही. इतके वाईट, क्रूर आणि टीकाकार होण्याचे धाडस तुम्ही कसे गोळा करता?” असं कंगनाने ‘द व्हॅक्सिन वॉर’वर टीका करणाऱ्या पोस्टला टॅग करत म्हटलं.

तिचं हे ट्वीट रिट्वीट करत एका महिलेने लिहिलं, “त्याला पाठिंबा देऊ नकोस. विवेक अग्निहोत्रीपेक्षा वाईट कोणीच असू शकत नाही. त्याने नशेत माझ्याबरोबर गैरवर्तन केले. तो आर्टिस्ट नाही. तो शाहरुख खानबद्दलही बऱ्याच गोष्टी बोलला होता. त्याला खासकरून तुझ्यासारख्या थेट बोलणाऱ्या लोकांकडून सहानुभूतीची गरज नाही.”

महिलेच्या ट्वीटवर कंगनाची प्रतिक्रिया

महिलेच्या या ट्वीटला कंगनाने उत्तर दिलं. “मी प्रत्येकासाठीच इथे उभी आहे. ज्यांनी मला बरबाद करण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार सर्वकाही प्रयत्न केले, अगदी त्यांच्यासाठीही. मी चांगले भविष्य आणि सर्वांच्या भल्यासाठी उभी आहे,” असं कंगना रणौत म्हणाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman abuse allegations on vivek agnihotri kangana ranaut reacts hrc

First published on: 02-10-2023 at 08:27 IST
Next Story
कंगना रणौतच्या ‘चंद्रमुखी २’साठी मराठमोळ्या आर्या आंबेकरने गायलं आहे खास गाणं; गायिकेची पोस्ट चर्चेत