गोविंदा १९९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटांचा मोठा चाहता वर्गही होता. प्रेक्षक आजही त्याचे जुने चित्रपट आवडीने पाहतात. त्या काळात गोविंदाची महिला चाहत्यांमध्ये इतकी क्रेझ होती की त्या त्याच्या घराबाहेर आणि चित्रपटाच्या सेटबाहेर जमायच्या. गोविंदाची पत्नी सुनीताने सांगितलं की काही चाहत्या तर त्याला सेटवर पाहून बेशुद्ध व्हायच्या. गोविंदाच्या अशाच एका चाहतीचा किस्सा तिने सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोविंदाची खूप मोठी चाहती असलेल्या एका तरुणीने मोलकरीण म्हणून त्यांच्या घरात काम केलं होतं. इतकंच नाही तर ती मोलकरीण बनून २० दिवस त्यांच्या घरात राहिली होती. महत्त्वाचं म्हणजे ही ती एका मंत्र्याची मुलगी होती, असं सुनीताने सांगितलं. टाइमआउट विथ अंकित पॉडकास्टमध्ये सुनीताने तिच्या पतीची किती फॅन फॉलोइंग होती, याचा एक किस्सा सांगितला.

“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”

चाहती मोलकरीण बनून आली

सुनीता म्हणाली, “एक त्याची चाहती होती जिने मोलकरीण असल्याचं नाटक केलं होतं आणि ती जवळपास २०-२२ दिवस आमच्याबरोबर घरात राहिली. मला वाटतं की ती एखाद्या गरीब कुटुंबातील आहे अशी दिसायची. मी माझ्या सासूबाईंना म्हटलं की तिला भांडी कशी घासावी किंवा घर कसे साफ कसे करावे हे माहीत नाही. नंतर आम्हाला कळालं की ती कोणत्यातरी मंत्र्याची मुलगी आणि गोविंदाची चाहती आहे.”

“जवानमध्ये काम करणं हा सर्वात वाईट अनुभव”, शाहरुख खानच्या सिनेमाबद्दल स्पष्टच बोलला अभिनेता; म्हणाला…

सुनिता पुढे म्हणाली, “मी त्यावेळी लहान होते पण मला तिच्यावर संशय आला. ती रात्री उशिरापर्यंत जागी राहायची आणि गोविंदाची वाट पाहत असायची. मी हे सगळं बघत होते, नंतर ती कोण आहे याबाबत मी तिला विचारणा केली. त्यावर तिने रडत कबुली दिली की गोविंदाची चाहती आहे. मग तिचे वडील तिला घ्यायला आले, त्यांच्योबरोबर इतर चार गाड्या होत्या. ती जवळपास २० दिवस आमच्या घरी राहिली. असे गोविंदाचे चाहते होते.”

बॉलीवूड अभिनेता पत्नीला म्हणतो, “…तर मी माधुरी दीक्षितशी लग्न केलं असतं”; धक धक गर्लच्या स्वभावाचं केलं कौतुक

दरम्यान, गोविंदाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर अवघ्या वर्षभरातच सुनीताशी १९८७ मध्ये लग्न केलं होतं. लग्नाची बातमी बाहेर आल्यास गोविंदाच्या करिअरवर त्याचा परिणाम होईल या भीतीने या जोडप्याने त्यांचे लग्न वर्षभर लपवून ठेवले होते. त्यांची मुलगी जवळपास एक वर्षाची असताना त्यांनी लग्नाची घोषणा केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman fan of bollywood actor stayed at home as maid sunita ahuja says she was minister daughter hrc
Show comments