बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खानने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘दबंग’ ‘वॉन्टेड’ चित्रपटांमुळे त्याची ओळख बदलली. कधी रोमँटिक हिरो तर कधी ऍक्शन हिरो म्हणून सलमानकडे पहिले जाते. त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या संवादांची चर्चा जास्त होते. लोकांना त्याची स्टाईल भावते. आजवर त्यांनी अनेक लेखक दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे मात्र त्याच्या वडिलांनी आजवर त्याच्यासाठी कोणतीच कथा लिहली नाही.

सलमान खानचे वडील सलीम खान हे बॉलिवूडमधील एक दिग्गज लेखक, ज्यांनी ‘दिवार’, ‘शोले’, ‘जंजीर’सारखे चित्रपट लिहले आहेत. त्यांनी २०१४ साली इंदू मीरानी यांना मुलाखत देत असताना सलमानसाठी कथा न लिहण्यामागचं कारण सांगितलं आहे. ते जेव्हा एखादी कथा निर्मात्यांना सुचवायचे तेव्हा निर्माते त्यांना सांगायचे तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन का नाही करत? ते म्हणाले की “सलमानबरोबर काम करण्यात एक समस्या आहे की चित्रपट जर चालला तर सलमानची चर्चा होणार फ्लॉप झाला तर सलीम खानमुळे झाला अशी चर्चा होणार.” या मुलाखतीत त्यांनी अनेक किस्से सांगितले आहेत.

Jayant Patil on Ajit pawar letter
‘सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही’, अजित पवारांचं म्हणणं खरं; जयंत पाटील पुढे म्हणाले…
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

आलिया भट्टची घोडदौड सुरूच; हॉलिवूडनंतर आता झळकणार ‘या’ चित्रपटात?

सलीम खान यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत सलीम खान यांचं योगदान अत्यंत मौल्यवान आहे. १९३५ मध्ये इंदौरमध्ये जन्मलेल्या सलीम खान यांनी कित्येक अजरामर चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहेत. जावेद अख्तर यांच्याबरोबर ते पटकथा लिहत असत. सलीम खान हे त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठीसुद्धा बरेच चर्चेत होते. मनोरंजनसृष्टीत सलीम खान आणि हेलन या जोडीच्या भरपूर चर्चा रंगल्या. कुटुंबाचा विरोध पत्करून सलीम खान यांनी हेलन यांच्याशी लग्नगाठ बांधली होती.

सलीम खान यांनी १९६४ साली सुशील चारक यांच्याशी लग्न केलं होतं. सलमान, अरबाज, सोहेल आणि अलवीरा ही सलीम खान आणि सुशीला यांची चार अपत्य आहेत. त्यातील त्यांचे मुलगे सलमान सोहेल अरबाज हे तिघे बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत तर अलवीरा फाशीं डिझायनर आहे.