२०२२ साली प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा अजूनही होते. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तूफान चालला अन् प्रेक्षकांनीही तो उचलून धरला. काश्मिरी पंडितांच्या पलायन आणि नरसंहारावर बेतलेल्या या चित्रपटाने कित्येकांची झोप उडवली अन् देशात यावरुन बरेच वादही निर्माण झाले. आता पुन्हा एकदा काश्मीर आणि खासकरून ‘आर्टिकल ३७०’वर भाष्य करणारा अन् ते कलम हटवण्यामागची खरी कहाणी प्रेक्षकांसमोर मांडणारा ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात यामी गौतम, प्रियामणी, अरुण गोविल हे प्रमुख भूमिकेत असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. या चित्रपटात यामी एका NIA अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे, जीला काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर शांतता प्रस्थापित करण्याची तसेच दहशतवाद्यांची मोहीम हाणून पडायची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
usha mehta congress radio
ब्रिटिशांना आपल्या आवाजाने ‘सळो की पळो’ करून सोडणार्‍या उषा मेहतांची कहाणी

आणखी वाचा : पंतप्रधान मोदींवरील बायोपिकचा उल्लेख करत प्रकाश झा यांचं ‘बॉयकॉट ट्रेंड’वर केलं भाष्य; म्हणाले, “अशा गोष्टींना…”

चित्रपटात ‘३७० कलम’ हटवण्यामागचा संघर्ष, काश्मीरचा इतिहास व आतंकवादाची पार्श्वभूमी, राजकीय हस्तक्षेप या सगळ्यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. तसेच याबरोबरच दमदार संवादांची फोडणीदेखील या चित्रपटाला देण्यात आली आहे. एकीकडे या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहेत तर काही लोक या चित्रपटाला ‘द काश्मीर फाइल्स’ प्रमाणे ‘प्रोपगंडा’ म्हणवून हिणवू पहात आहेत. याच वृत्तीला चित्रपटातील अभिनेत्री यामी गौतम हिने प्रत्युत्तर दिलं आहे.

‘पीटीआय’शी संवाद साधतांना यामी गौतम म्हणाली, “जर कुणी या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणून हिणवू पहात असेल, जर कुणी हा चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात कोणताही पूर्वग्रह मनात ठेवून जाणार असेल तर त्यांना एखादी कलाकृती पाहायचा आनंद कधीच मिळू शकत नाही. अशा लोकांना मी कोणतंही स्पष्टीकरण देऊ इच्छित नाही, मला वाटत नाही प्रेक्षक असा विचार करत असतील. हा चित्रपट प्रेक्षकांसाठीच बनवला आहे, किंबहुना कोणताही दिग्दर्शक प्रेक्षकाला समोर ठेवूनच चित्रपट सादर करतो. माझ्या प्रेक्षकांनी मला कधीच निराश केलेलं नाही.” हा चित्रपट २३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. यानंतर लवकरच यामी गौतम प्रतीक गांधीबरोबर ‘धूम धाम’ या चित्रपटात दिसणार आहे.