Mardaani 3 : बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा वरिष्ठ निरीक्षक शिवानी शिवाजी रॉय या भूमिकेत झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. शुक्रवारी ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा राणी मुखर्जीचा भारदस्त अभिनय पाहता येणार आहे.

‘मर्दानी २’ रिलीजच्या वर्धापन दिनानिमित्त यश राज फिल्म्सने ‘मर्दानी ३’ची घोषणा करत एक पोस्टर शेअर केलं आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं, “प्रतीक्षा संपली! ‘मर्दानी ३’मध्ये राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉय या भूमिकेत दिसणार आहे. २०२६ मध्ये चित्रपटगृहांत.” राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची नेमकी तारीख अद्याप समोर आलेली नाही.

Aata Hou De Dhingana Season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अद्वैतने कलासाठी आणली सवत; पतीला जिंकण्यासाठी कला लावतेय ताकद…; व्हिडीओ व्हायरल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab sent mangala movie trailer to Bollywood celebrity on instagram
शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…

हेही वाचा : “त्या चित्रपटाच्या ३०-३५ वर्षांनंतरही माधुरीमुळे ती…”, नाना पाटेकर माधुरी दीक्षितबद्दल काय म्हणाले?

‘मर्दानी ३’ चित्रपटाचे दिग्दर्शन अभिराज मीनावाला करणार आहे, तर निर्मिती आदित्य चोपडा करणार आहे. अभिनेत्री राणी मुखर्जीने यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिने म्हटलं, “मला ही घोषणा करताना फार आनंद होत आहे की, आम्ही २०२५ मध्ये ‘मर्दानी ३’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करत आहोत. पोलिसांच्या वर्दीत अशा भूमिका साकारणे प्रत्येक कलाकारासाठी एक अभिमानाची गोष्ट असते, मझ्यासाठीदेखील ही फार मोठी गर्वाची गोष्ट आहे. आजवर मोठ्या हिमतीने सर्वांचे रक्षण करताना बलिदान दिलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी ही एक श्रद्धांजली आहे.”

“मागच्या दोन चित्रपटांच्या तुलनेत ‘मर्दानी ३’ फार खास असणार आहे. आम्ही जेव्हा हा चित्रपट करण्याचे ठरवले तेव्हा आम्ही एका प्रभावी आणि चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात होतो; ज्याने प्रेक्षकांनादेखील चांगला अनुभव मिळेल, अशी स्क्रिप्ट आम्ही शोधत होतो. ‘मर्दानी’ आणि ‘मर्दानी २’वर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे. त्यामुळे आता ‘मर्दानी ३’साठी चाहत्यांच्या फार अपेक्षा आहेत आणि त्यांच्या या अपेक्षा पूर्ण करणे आमचे काम आहे”, असंही राणी मुखर्जीने पुढे म्हटलं.

हेही वाचा : बॉलीवूडने बहिष्कार टाकूनही विवेक ओबेरॉय कसा झाला ३४०० कोटींचा मालक? भर कार्यक्रमात सांगितला बिझनेस प्लॅन

मर्दानी चित्रपटाच्या सीरिजबद्दल

२०१४ मध्ये पहिल्यांदा ‘मर्दानी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रदीप सरकारच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. त्यानंतर २०१९ मध्ये गोपी पुथरण दिग्दर्शित ‘मर्दानी २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटालाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. दोन्ही चित्रपटांत राणी मुखर्जीच्या अभिनयाचे चाहत्यांनी कौतुक केले होते, त्यामुळे आता “‘मर्दानी ३’ चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षक काय प्रतिक्रिया देणार हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे”, असंही राणी मुखर्जीने म्हटलं आहे.

Story img Loader