Bollywood Sequel Films: दरवर्षी अनेक भाषांतील, विविध जॉनरचे, वेगळ्या धाटणीचे विविध चित्रपट प्रदर्शित होतात. यावर्षीदेखील ‘छावा’, ‘धुरंधर’सारखे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे चित्रपट प्रदर्शित झाले.
यामध्ये काही सिक्वेल चित्रपटांचादेखील समावेश आहे. आता २०२५ मध्ये कोणते चित्रपट प्रदर्शित झाले आणि या चित्रपटांनी किती कमाई केली हे जाणून घेऊ…
१. रेड २
‘रेड २’मध्ये अभिनेता अजय देवगण आणि रितेश देशमुख प्रमुख भूमिकेत दिसले होते. १ मे २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.’रेड २’ने बॉक्स ऑफिसवर १७३.४४ कोटी रुपये कमावले होते.
२. केसरी – चॅप्टर २
अक्षय कुमारचा ‘केसरी – चॅप्टर २’ हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केसरी’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात अनन्या पांडे आणि आर माधवन देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले. ‘केसरी – चॅप्टर २’ने बॉक्स ऑफिसवर ९२.७४ कोटी कमावले होते.
३. बागी ४
टायगर श्रॉफचा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट ‘बागी ४’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५३.३८ कोटी रुपये कमावले. टायगर श्रॉफसह या चित्रपटात सोनम बाजवा आणि हरनाज संधूदेखील प्रमुख भूमिकेत दिसले.
४. मस्ती ४
‘मस्ती ४’ देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. आफताब शिवदासानी, विवेक ओबेरॉय आणि रितेश देशमुख हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले. ‘मस्ती ४’ने बॉक्स ऑफिसवर १४.६६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
५. हाऊसफुल ५
‘हाऊसफुल ५’ने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली. अक्षय कुमारच्या या मल्टीस्टारर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८३.३८ कोटी रुपये कमावले होते.
६. दे दे प्यार दे २
अजय देवगणचा ‘दे दे प्यार दे २’ हा विनोदी चित्रपट प्रेक्षकांना आवडला. या चित्रपटात रकुल प्रीत सिंह, आर माधवन आणि मीजान जाफरी हे आणि इतर कलाकारही दिसले. ‘दे दे प्यार दे २’ने बॉक्स ऑफिसवर ७२ कोटी रुपये कमावले.
७. ‘वॉर २’
‘वॉर २’ हा या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक होता. पण, तो प्रदर्शित झाल्यानंतर फ्लॉप ठरला. हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त २३६.५५ कोटी रुपये कमाई केली.
८. जॉली एलएलबी ३
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा ‘जॉली एलएलबी ३’मध्ये कॉमेडी-कोर्टरूम ड्रामा आहे. १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ११७.५ कोटी रुपये कमावले.
९. सितारे जमीन पर
‘सितारे जमीन पर’ हा आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. २० जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १६७.४६ कोटी रुपये कमावले.
१०. सन ऑफ सरदार २
१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटाने फक्त ४७.०३ कोटी रुपये कमावले होते. चित्रपटात अजय देवगणसह मृणाल ठाकूर आणि रवी किशन यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
११. धडक २
सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘धडक २’ हा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धडक’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त २३.४२ कोटी रुपये कमाई केली.
१२. मेट्रो इन दिनों
अनुराग बसू दिग्दर्शित ‘मेट्रो इन दिनों’ ४ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अली फजल, सारा अली खान, फातिमा सना शेख आणि आदित्य रॉय कपूर हे कलाकार दिसले.
