Best Bollywood love Stories For Valentines Day : प्रेमाला वयाची मर्यादा नसते आणि बॉलीवूडने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यातील प्रेम खूप सुंदरपणे दाखवलं आहे. पहिल्या प्रेमापासून ते आयुष्यात उशिरा सापडलेल्या साथीदारापर्यंत, हिंदी चित्रपटांनी आपल्याला दाखवून दिलं आहे की प्रेमाला कशाचंच बंधन नसतं.

१४ फेब्रुवारीला असणाऱ्या व्हॅलेंटाईन डेनिमित्त आम्ही तुम्हाला प्रेमावर आधारित चित्रपटांची नावं सांगणार आहोत, जी तुम्ही घरबसल्या पाहू शकता. या व्हॅलेंटाईन सीझनमध्ये काही हलकं-फुलकं आणि मनाला आनंद देणारं पाहायचं असेल, तर बॉलीवूडमधील हे चित्रपट नक्की पाहा…

व्हॅलेंटाईन डेनिमित्त पाहा बॉलीवूडचे ‘हे’ चित्रपट

कुछ कुछ होता है – १९९८ मध्ये आलेल्या या चित्रपटात मैत्री आणि प्रेमावर भाष्य करण्यात आलं आहे. यामध्ये शाहरुख खान, राणी मुखर्जी व काजोल महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकलेले.९०च्या काळातील सुपरहिट रोमँटिक चित्रपट आहे आहे.

Award Banner

यह जवानी है दिवानी – २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातही मित्रांची गोष्ट आहे. परंतु, यामध्ये जेव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा काय होतं, त्यांचं नातं कसं बदलतं आणि घट्ट होतं हे पाहायला मिळतं. दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, अदित्य रॉय कपूर हे कलाकार यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळतात.

दिल चाहता है – २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात आमिर खान, अक्षय खन्ना, सैफ अली खान, प्रिती झिंटा हे कलाकार पाहायला मिळत आहेत. यामध्ये माणसाच्या वाढत्या वयामुळे त्याच्या रिलेशनशिपमध्ये आणि प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो हे पाहायला मिळतं. यामध्ये तीन मित्रांच्या तीन प्रेमकहाण्या पाहायला मिळतात.

बागबान – २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, सलमान खान हे कलाकार पाहायला मिळतात. कुटुंब, प्रेम, संस्कार या गोष्टी यामध्ये पाहायला मिळतात.

चिनी कम – २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ३४ वर्षांची महिला ६४ वर्षांच्या पुरुषाच्या प्रेमात पडते तेव्हा काय होतं हे पाहायला मिळतं. यामधून प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे पाहायला मिळतं.

द लंचबॉक्स – २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात इरफान खान व निम्रत कौर यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळते. यामध्ये प्रेम कधीही आयुष्यात येऊ शकतं आणि माणूस प्रेमात पडल्यानंतर त्याचं आयुष्य कसं बदलतं हे पाहायला मिळतं.

शुभ मंगल ज्यादा सावधान – २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात आयुष्मान खुराना व जितेंद्र कुमार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात जेव्हा दोन गे पुरुष एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा काय होतं, त्यांना कसा संघर्ष करावा लागतो हे यामधून पाहायला मिळतं.

वीर-झारा – शाहरुख खान व प्रिती झिंटा यांची मुख्य भूमिका असलेला हा रोमँटिक चित्रपट आहे. त्याग, प्रेम, संयम आणि वेळेनुसार प्रेम कसं अजून वाढत जातं हे पाहायला मिळतं.

पिकू – या चित्रपटात अमिताभ बच्चन, इरफान खान, दीपिका पादुकोण महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहयला मिळतात. बाप-लेकीच्या नात्यावर चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे. परंतु, इरफान खान व दीपिका पादुकोण यांची प्रेमकहाणीसुद्धा यामध्ये पाहायला मिळते. चित्रपटात प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसते तर लहान सहान गोष्टीसुद्धा प्रेमासाठी महत्त्वाच्या असतात, हे पाहायला मिळतं.