अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अभिनेता झहीर इक्बाल रत्नासी याच्याशी लग्न करणार आहे. दोघांचं लग्न आंतरधर्मीय आहे, त्यामुळे सोनाक्षी इस्लाम स्वीकारणार का, याबद्दल चर्चा होत आहेत. झहीरचे वडील इक्बाल रत्नासी यांनी या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. लग्न कोणत्याही धर्माच्या पारंपरिक पद्धतीनुसार होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. हे लग्न हिंदू किंवा मुस्लीम परंपरेने नव्हे तर नोंदणी पद्धतीने होईल असं इक्बाल रत्नान्सी यांनी ‘फ्री प्रेस जर्नल’ला सांगितलं.

सोनाक्षी व झहीर विशेष विवाह कायदा, १९५४ नुसार लग्न करतील. झहीरचे वडील म्हणाले की २३ जून रोजी हे लग्न वांद्रे येथील कार्टर रोडवरील त्यांच्या घरी होईल. विशेष विवाह कायद्यांतर्गत, जोडप्याने निवडलेल्या ठिकाणी लग्नाच्या नोंदणीसाठी रजिस्ट्रार येईल व कायदेशीर औपचारिकता पूर्ण करेल.

‘मिर्झापूर’ मधील इंटिमेट सीनबद्दल अभिनेत्री रसिका दुग्गल म्हणाली, “रिहर्सलच्या वेळीच मला जाणवलं की…”

सोनाक्षी लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारणार अशा चर्चा होत आहेत, त्याबाबत इक्बाल रत्नासी यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले. “ती धर्मांतर करणार नाही. इथे दोन मनं एकत्र येत आहेत, त्यामुळे यात धर्म हा विषय नाही. माझा मानवतेवर विश्वास आहे. हिंदू धर्मात देवाला भगवान म्हणतात आणि मुस्लीम धर्मीय अल्लाह म्हणतात. पण सरतेशेवटी आपण सर्वजण माणूस आहोत. माझे आशीर्वाद नेहमी झहीर आणि सोनाक्षीच्या पाठीशी आहेत,” असं इक्बाल रत्नासी म्हणाले.

शत्रुघ्न सिन्हा यांच्या बंगल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई; सोनाक्षीच्या हातावर सजली झहीर इक्बालच्या नावाची मेहंदी

सोनाक्षी व झहीरच्या लग्नाबद्दल त्यांचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत. गुरुवारी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांची भेट घेतली आणि एकत्र वेळ घालवला. त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी होणारा जावई झहीरबरोबर पापाराझींसमोर पोज दिल्या आणि त्याला मिठी मारली. सोनाक्षीच्या लग्नानिमित्त शत्रुघ्न सिन्हा यांचा मुंबईतील ‘रामायणा’ बंगल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दोघांचा मेहंदी समारंभ शुक्रवारी झाला असून आता लग्नाकडे लक्ष लागलं आहे. सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नाचं रिसेप्शन २३ जूनला संध्याकाळी मुंबईत होणार आहे.

या आठवड्यात OTT वर रिलीज झालेले चित्रपट अन् वेब सीरिजची यादी

सोनाक्षी सिन्हाबद्दल बोलायचं झाल्यास ती नुकतीच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. ती लवकरच रितेश देशमुखबरोबर एका चित्रपटात दिसणार आहे. तिने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दुसरीकडे झहीरचे वडील ज्वेलर आणि फायनान्सर आहेत, मात्र तो अद्याप बॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करू शकलेला नाही. त्याने मागच्या पाच वर्षांत चार चित्रपट केले आहेत.