scorecardresearch

Premium

‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाच्या कमाईत रविवारी मोठी वाढ, आतापर्यंत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Zara Hatke Zara Bachke Box Office Collection Day 3 : विकी कौशल-सारा अली खानच्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती

sara-ali-khan-vicky-kaushal
सारा अली खान, विकी कौशल

Zara Hatke Zara Bachke Box Office Collection Day 3 : विकी कौशल आणि सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपट शुक्रवारी २ जून रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी पाच कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे.

हेही वाचा – सारा व विकीच्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती, ‘जरा हटके जरा बचके’ने पहिल्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
ajit pawar
“माझ्याकडील अर्थखातं पुढं टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही, पण…”, अजित पवारांचं विधान
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’

‘जरा हटके जरा बचके’मध्ये पहिल्यांदाच विकी कौशल आणि सारा अली खान यांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली आहे. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली आहे, त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. ‘जरा हटके जरा बचके’ने पहिल्याच दिवशी ५.४९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. वीकेंडला कमाईत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. शनिवारी चित्रपटाने ७.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आता रविवारची आकडेवारीही समोर आली आहे.

हेही वाचा – शारीरिक संबंधांना खेळ म्हणून मान्यता, ‘या’ देशात होणार पहिली सेक्स चॅम्पियनशिप

‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेड रिपोर्टनुसार, ‘जरा हटके जरा बचके’ ने रिलीजच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच रविवारी ९ कोटी रुपये कमावले आहे. या चित्रपटाच्या ओपनिंग वीकेंडची एकूण कमाई आता २१.६९ कोटी रुपये झाली आहे. अवघ्या ४० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट तीन दिवसांत २१ कोटी कमावण्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळे या आठवड्यात चित्रपट बॉक्सऑफिसवर सरासरी कमाई करू शकतो, असे अंदाज वर्तवले जात आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 07:47 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×