scorecardresearch

कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर जरीन खानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “मला पूर्ण खात्री आहे की…”

कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्यावर काय म्हणाली अभिनेत्री जरीन खान? वाचा

zareen khan reaction on arrest warrant against her by kolkata court
जरीन खानची अटक वॉरंटवर प्रतिक्रिया (फोटो – जरीन खान इन्स्टाग्राम)

अभिनेत्री जरीन खानविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्याची माहिती १७ सप्टेंबर रोजी समोर आली होती. कोलकाता येथील एका इव्हेंट कंपनीने अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सियालदह न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. यासंदर्भात अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री जरीन खान विरोधात अटक वॉरंट जारी; फसवणूकीच्या तक्रारीवरून कोलकाता न्यायालयाचा आदेश

couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

या प्रकरणी जरीन खानला विचारण्यात आले तेव्हा ती ‘आज तक’ला म्हणाली, “मला पूर्ण खात्री आहे की यात काहीही सत्य नाही. माझ्याबद्दल ही बातमी ऐकून मला स्वतःला धक्काच बसला. मी माझ्या वकिलाशी बोलत आहे. मी त्यांना विचारेन की हे सर्व काय आहे, त्यानंतरच मी तुम्हाला याबद्दल काही स्पष्टीकरण देऊ शकेन. तोपर्यंत तुम्ही माझ्या पीआरशी बोलू शकता. यावर त्यांचे काही म्हणणे असेल तर ते सांगतील.”

दीपिका पदुकोणने शाहरुख खानला किस करतानाचा फोटो केला शेअर, पती रणवीर सिंहच्या कमेंटने वेधलं लक्ष

नेमकं प्रकरण काय?

२०१८ साली ६ कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल जरीनविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. कोलकाता आणि उत्तर २४ परगणा येथील काली पूजेच्या ६ कार्यक्रमांना जरीन हजर राहिली नाही. त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्यावतीने नरकेलडांगा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार देण्यात आली. नरकेलडांगा पोलिसांनी सियालदह न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. याच प्रकरणात कोर्टाने जरीनविरोधात अटक वॉरंट जारी केल्याचं वृत्त आहे. पण अभिनेत्रीने ते फेटाळून लावले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 13:54 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×