Zarina Wahab on Jiah Khan Suicide: अभिनेत्री जिया खान ३ जून २०१३ रोजी मुंबईमधील जुहू परिसरातील घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली होती. जियाचा मृत्यू झाला, त्यावेळी ती २५ वर्षांची होती. जियाने आत्महत्येपूर्वी सूरजसोबतच्या नात्याबाबत लिहिलेले पत्रही पोलिसांना सापडले होते. त्याच्या आधारे पोलिसांनी सूरजला आरोपी केलं होतं. तसेच त्याच्यावर जिया हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटकही केली होती. याच आरोपांतर्गत सूरजवर १० वर्षे खटला चालवण्यात आला. अखेर त्याची एप्रिल २०२३ मध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली. जियाच्या आत्महत्या प्रकरणावर सूरजची आई अभिनेत्री झरीना वहाबने एका मुलाखतीत भाष्य केलंय.

जिया खानने सूरज पंचोलीला भेटण्यापूर्वी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा दावा झरीनाने केला आहे. “तिने त्याआधीही ४-५ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण नशीब असं होतं की ती माझ्या मुलाबरोबर असताना हे सगळं घडलं,” असं झरीना लेहरेन रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
Lal Bahadur Shastri Death : लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं?
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…

हेही वाचा – रजनीकांत यांच्या मुलीचा घटस्फोट, धनुष व ऐश्वर्या २० वर्षांच्या संसारानंतर कायदेशीररित्या विभक्त

सूरज हा अभिनेता आदित्य पंचोली व झरीना वहाब यांचा मुलगा आहे. जियाने आत्महत्या केली तेव्हा सूरज तिला डेट करत होता. जियाने आत्महत्या केल्यावर सूरजला अटक झाली होती. या प्रकरणाचा कुटुंबावर कसा परिणाम झाला, त्याबाबत झरीनाने सांगितलं. १० वर्षे हे सगळं सहन करावं लागलं असंही झरीना म्हणाली.

हेही वाचा – घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या रायने हटवलं ‘बच्चन’ आडनाव? दुबईतील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

सूरजच्या करिअरवर परिणाम झाला – झरीना

“आम्ही सर्वजण खूप वाईट काळातून गेलो, पण माझा एका गोष्टीवर विश्वास आहे: ‘जर तुम्ही खोटं बोलून कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करत असाल तर तुम्हाला त्याची व्याजासह परतफेड करावीच लागते.’ सूरज दोषी नव्हता, आम्ही सगळं सहन केलं, १० वर्षे लागली पण तो त्यातून निर्दोष बाहेर पडला आणि मी आनंदी आहे. या घटनेचा सूरजच्या करिअरवरही परिणाम झाला,” असं झरीना म्हणाली.

हेही वाचा – अभिषेक बच्चन घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पहिल्यांदाच ऐश्वर्या रायबद्दल म्हणाला, “मला माहीत आहे की ऐश्वर्या…”

सूरजने २०१५ साली ‘हिरो’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात अथिया शेट्टीदेखील मुख्य भूमिकेत होती. या व्यतिरिक्त सूरजने ‘बी हॅप्पी’, ‘हवा सिंग’, ‘टाइम टू डान्स’, ‘सॅटेलाइट शंकर’ या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Story img Loader