झी सिने पुरस्कार हा बॉलीवूड सिने-जगतामधील नामांकित पुरस्कार सोहळा मानला जातो. दरवर्षी झी वाहिनीद्वारे कलाकारांच्या उत्तम कामगिरीसाठी हा सोहळा आयोजित केला जातो आणि यावर्षीही १० मार्च रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला. शाहरुख खान, बॉबी देओल, अदा शर्मा, कियारा अडवाणी, क्रिती सेनॉन, आलिया भट्ट, राणी मुखर्जी अशा अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. बॉलीवूडमधील कलाकारांना झी सिनेमा पुरस्कारासाठी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकन होते आणि शाहरुख खान, राणी मुखर्जीसह अनेक कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. हेही वाचा. अजय देवगणच्या ‘शैतान’ चित्रपटाची झाली दणक्यात सुरुवात; तीन दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी अभिनेत्री कियारा अडवाणीला 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटातील कथा या पात्रासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर बॉलीवूडची मदार्नी राणी मुखर्जीलासुद्धा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) या पुरस्काराने गौरविण्यात आलं. याबाबत कृतज्ञता व्यक्त करत कियाराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा आणि राणी मुखर्जीचा ट्रॉफीसह एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देतं कियाराने लिहिले, "मला माझ्या आवडत्या अभिनेत्रीसह सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने गौरविण्यात आले. मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल झी सिने अवॉर्ड्स तुमचे मनापासून आभार. प्रेक्षकांच्या प्रेमापेक्षा मोठा विजय नसतो, ज्यांनी मला मत दिले आणि कथाला तुमच्या हृदयात स्थान दिले; त्या प्रत्येकाचे मी आभार मानते." कियाराने झी सिने पुरस्कार सोहळ्यात गुलाबी रंगाचा प्लंज नेक गाऊन परिधान केला होता. न्यूड मेकअप आणि डायमंड ज्वेलरीसह तिने हा लूक पूर्ण केला. राणी मुखर्जीने तपकिरी रंगाच्या साडीची निवड केली होती. कियाराच्या या फोटोवर अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. यात कियाराच्या पतीच्या म्हणजेच सिद्धार्थ मल्होत्राच्या कमेंटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोला कमेंट करत सिद्धार्थ म्हणाला, "मला तुझा खूप अभिमान आहे, तुझे मनापासून अभिनंदन बाळा." हेही वाचा. हिरवा चुडा, मेहेंदीने रंगलेले हात… पूजा सावंतने शेअर केले हनिमूनचे फोटो; म्हणाली, “अजूनही…” दरम्यान, कियाराच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, 'गेम चेंजर' या तेलुगु चित्रपटात कियारा साउथ स्टार राम चरणबरोबर झळकणार आहे. 'वॉर-२' आणि 'डॉन-३' या आगामी चित्रपटांत कियारा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे.