राज कपूर आणि झीनत अमान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला. मात्र, या चित्रपटात राज कपूर झीनत अमान यांना रुपाची भूमिका देण्यास उत्सुक नव्हते. मात्र, झीनत अमान यांना ती भूमिका करायची होती. राज कपूर यांनी ती भूमिका त्यांना द्यावी यासाठी त्यांनी काय केले होते, याचा खुलासा त्यांनी काल सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले होते. आता त्यांनी दुसरी पोस्ट शेअर करत पुढे काय घडले याबद्दल लिहिले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी लिहिले, “माझ्या कल्पनेत जशी रुपा वाटत होती, तशी मी तयार झाले. मी घागरा चोळी घातली आणि रिबीनीने माझ्या केसांच्या वेण्या घातल्या. त्यानंतर माझ्या चेहऱ्यावर डिंकाने टिश्यू पेपर चिटकवून डाग लावला आणि राजजींना भेटायला गेले”, अशी आठवण सांगितली आहे.
काय म्हणाल्या झीनत अमान?
आता त्यांनी पुढे काय घडले याबद्दल खुलासा केला. त्यांनी म्हटले, “जॉनने राजजींना माझा निरोप दिला. लवकरच राजजी मला भेटण्यासाठी आले. मला त्या अवतारात बघून, गावाकडील मुलीच्या रुपात बघून त्यांना खूप आनंद झाला होता. जेव्हा त्यांचे हसणे थांबले, तेव्हा एक फोन करण्याच्या निमित्ताने ते बाजूला गेले. २० मिनिटानंतर त्यांची पत्नी कृष्णाजी दारात उभ्या होत्या. मूठभर सोन्याच्या गिनी त्यांच्या पर्समध्ये होत्या. राजजींनी चित्रपटाच्या स्वाक्षरीची किंमत म्हणून त्या माझ्याकडे मोठ्या आस्थेने दिल्या आणि अशा प्रकारे मला रुपाची भूमिका मिळाली. त्या सोन्याच्या गिनी मी अनेक वर्षे माझ्याजवळ जपून ठेवल्या होत्या. काही वर्षांपूर्वी त्या चोरीला गेल्या. पण, तरीही जर मला सोने आणि आठवणी यामधील एक काहीतरी निवडायला सांगितले तर आठवणी निवडेन.”
“मी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी जो प्रयत्न केला होता, त्यामुळे राजजी प्रभावित झाले होते, असे मला नंतर समजले”, अशी आठवण झीनत अमान यांनी सांगितली आहे.
हेही वाचा: जया बच्चन यांना मातृशोक; इंदिरा भादुरी यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन
राज कपूर आणि झीनत अमान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्वाचा चित्रपट मानला जातो. झीनत अमान यांनी साकारलेल्या रुपा या पात्राची मोठी चर्चा झाली होती. मात्र सुरूवातीला राज कपूर झीनत अमान यांना रुपाच्या भूमिकेत घेण्यासाठी उत्सुक नव्हते. नावाजलेली अभिनेत्री असूनही त्यांना भूमिका मिळत नसल्याचे त्याचा झीनत अमान यांना त्रास होऊ लागला. ती भूमिका मिळवण्यासाठी झीनत अमान यांनी काय केले होते, हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी खुलासा केला आहे.