शाहरुख खानच्या चित्रपटाचं पुण्यात शूटिंग ; मेट्रो कर्मचाऱ्यांसोब काढले फोटो

फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

shah-rukh-khan
Photo-Loksatta File Images

बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खान. शाहरुख खाने आजवर एका पेक्षा एक चित्रपटात काम करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. मात्र २०१८ नंतर त्याने कोणत्याही चित्रपटात काम केलं नाही. त्यामुळे चाहते पुन्हा एकदा त्याला मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी खुप उत्सुक झाले आहेत. अशात शाहरुक खानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हायरल झालेले फोटो त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे आहेत अशा चर्चा रंगत आहेत. मात्र अजून ही हे शूटिंग सुरू झालं असल्याची माहिती समोर आली नाही.

काही दिवसांपूर्वी शाहरुख पुण्याला आगामी चित्रपटाचे शूटिंग करायला गेला असल्याच्या अफवा होत्या. आता शाहरुखच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये, तो पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत पोझ देताना दिसत आहेत. त्यामुळे आता हे फोटो पाहून चाहते असा अंदाज लावत आहेत की तो तमिळ दिग्दर्शक अॅटली कुमारच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करायला पुण्यात गेला आहे. या व्हायरल फोटोत शाहरुखने काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचे दिसून येत आहेत. तसंच त्याने सेफ्टीसाठी मास्क देखील घातल्याचे या फोटोत दिसत आहेत.

फॅनने शेअर केलेल्या या फोटोवर नेटकरी कमेंट करुन त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. दरम्यान २०१९ मध्ये तमिळ दिग्दर्शक अॅटलीला ask me anything सेशन घेतलं होतं. त्यावेळेस त्याला एका चाहत्याने शाहरुख खानसोबत काम करायला आवडेल का असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देत त्याने सांगितले होते, “मला #SRK सरांबद्दल खुप प्रेम आणि आदर आहे आणि त्यांना माझे काम देखील आवडते. लवकरच आम्ही एकत्र काम करू अशी आशा आहे. ”

‘झिरो’ या चित्रपटानंतर शाहरुखला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आता आतुर झाले आहेत. दरम्यान शाहरुख सिद्धार्थ निगम दिग्दर्शित ‘पठाण’ या चित्रपटवर काम करत आहे. अद्याप निर्मात्यांकडून या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी २०२२ सालामध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशा चर्चा आहे. या चित्रपटात  शाहरुखसोबत दीपिका पादूकोण आणि जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bolywood actor shahrukh khan poses with mumbai metro officials as he begans to shoot for his upcoming film with tamil director attlee aad

ताज्या बातम्या