बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांमध्ये अभिनेते बोमन इराणी (Boman Irani) यांचं नाव आदराने घेतलं जातं. हिंदीमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये बोमन यांनी काम केलं आहे. तसेच त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोमन यांना चित्रपट प्रेक्षकांना कशाप्रकारे एकत्र आणतो? याबाबत विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं.

आणखी वाचा – नितीन गडकरींनी घेतली अमिताभ बच्चन यांची भेट, व्हायरल फोटोंमधील एका गोष्टीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोमन बॉलिवूड आणि हिंदी चित्रपटांबाबत खुलेपणाने बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “एकता, प्रेम, आपुलकी, बंधुता हे चित्रपटांचे मध्यवर्ती विषय असतात, म्हणूनच चित्रपट लोकांना एकत्र आणतो. याव्यतिरिक्त दुसरी एखादी गोष्ट जी लोकांना एकत्रित आणू शकते याबाबत मला माहित नाही. पण संपूर्ण बॉलिवूड पाकिस्तानमध्ये लोकप्रिय आहे.”

पाकिस्तानचा उल्लेख करत बोमन म्हणाले, “जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात असलेल्या पाकिस्तानमधील लोकांना जेव्हाही मी भेटतो तेव्हा ते माझं खूप प्रेमाने स्वागत करतात. ते पाहून माझ्या चेहऱ्यावर सुंदर हास्य येतं.” प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम, खासकरून पाकिस्तानी प्रेक्षकांचं आपल्यावर असलेलं प्रेम पाहून बोमन भारावून जातात.

आणखी वाचा – मुलगा झाला हो! सोनम कपूर-आनंद आहुजाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, पोस्ट शेअर करत म्हणाली…

“या साऱ्या गोष्टी एकत्र आणल्या की नकारात्मकता आपसुकच दूर होते. त्यांच्याकडून मिळणारा आदर, त्यांचा दयाळूपणा मला भारावून टाकतो.” बोमन यांनी पाकिस्तानी प्रेक्षक यांच्याबाबत केलेलं वक्तव्य सध्या सगळीकडेच चर्चेत आहे.