गेल्या काही दिवसांपासून देशभरातील सायबर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यात बहुतांश गुन्ह्यात ऑनलाइन आर्थिक फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अगदी सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेकांची सायबर फसवणूक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर यांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. बोनी कपूर यांना पावणे चार लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी आंबोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. आपले डेबिट किंवा क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती, पिन क्रमांक कोणालाही सांगू नये असं वारंवार बजावण्यात येतं. मात्र काही सराईत सायबर चोरट्यांनी बोनी कपूर यांची क्रेडीट कार्डची माहिती मिळवत फसवणूक केली आहे.

“मुलीसाठी नाव सुचवा” लेकीसोबतचा क्यूट व्हिडीओ शेअर करत कैलास वाघमारेने चाहत्यांना केली विनंती

काही सायबर चोरट्यांनी बोनी कपूर यांच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवत त्यांना पावणे चार लाखांचा गंडा घातला आहे. त्यांच्या बँक अकाऊंटमधून ३ लाख ८२ हजार रुपये लंपास करण्यात आले आहे. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या गुन्ह्याचा तपास आंबोली पोलिसांकडून केला जात आहे.

‘मस्जिद है या शिवाला…’ ज्ञानवापी मशीद वादानंतर मनोज मुंतशीर यांची कविता व्हायरल

दरम्यान बोनी कपूर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चित्रपट निर्माता आहेत. ‘मिस्टर इंडिया’, ‘नो एंट्री, जुदाई’, ‘वॉन्टेड’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे ते निर्माते आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक पुरस्कार पटकावले आहेत.