बोनी कपूर यांची इन्स्टाग्रामवर दणक्यात एंट्री, अर्जुन कपूर म्हणतो, “ते मुलांची हेरगिरी…”

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन ही बातमी सर्व चाहत्यांपर्यंत शेअर केली आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माते बोनी कपूर हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. बोनी कपूर यांनी नुकतंच सोशल मीडियावर त्यांचे अकाऊंट सुरु केले आहे. बोनी कपूर आत्तापर्यंत फक्त ट्विटरवर सक्रिय होते. पण आता त्यांनी इन्स्टाग्रामवर ही अकाऊंट सुरु केले आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन ही बातमी सर्व चाहत्यांपर्यंत शेअर केली आहे.

अर्जुन कपूर याने बोनी कपूर यांच्या नव्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा एक फोटो शेअर केला आहे. यावर कॅप्शन देताना तो म्हणाला, आज हे घडलं. अखेर वडील त्यांच्या मुलांची हेरगिरी करण्यासाठी आणि जगाला त्यांची फॅशनेबल बाजू दाखवण्यासाठी इन्स्टाग्रामवर आले आहे. विशेष म्हणजे अर्जुन कपूरसोबत जान्हवी कपूर, खूशी कपूर आणि सोनम कपूर यांच्यासह अनेकांनी बोनी कपूर यांचे इन्स्टाग्रामवर वेलकम केले आहे.

दरम्यान बोनी कपूर यांनी नुकतंच सुरु झालेले अकाऊंट अद्याप अधिकृत झालेले नाही. मात्र २४ तासांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या या अकाऊंटला जवळपास ६ हजार लोकांनी फॉलो केले आहे. बोनी कपूर यांनी ३० नोव्हेंबरला हे अकाऊंट सुरु केले आहे. त्यात त्यांनी त्यांचे काही खासगी फोटो शेअर केल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : ’83’ च्या ट्रेलरमध्ये सचिन तेंडूलकरला पाहिलतं का? ‘त्या’ सीनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

दरम्यान लवकरच बोनी कपूरही अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ते लवकरच लव रंजन दिग्दर्शित चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत झळकणार आहे. बोनी यांनी या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. तर दुसरीकडे जान्हवीने ‘मिली’ या तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण संपवले आहे. या चित्रपटातून जान्हवी पहिल्यांदा बोनी कपूर यांच्या प्रोडक्शन कंपनीतून काम करणार आहे. दरम्यान, जान्हवीने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आता जान्हवी ‘दोस्ताना २’ या चित्रपटात दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Boney kapoor joins instagram arjun kapoor and janhvi kapoor welcome him nrp

ताज्या बातम्या