scorecardresearch

“स्टारडम आणि ग्लॅमर कोणाला…” लेक खुशीच्या बॉलिवूड पदार्पणावर बोलले बोनी कपूर

बोनी कपूर यांनी खुशी कपूरच्या बॉलिवूड पदार्पणावर प्रतिक्रिया दिली आहे.

boney kapoor, khushi kapoor, boney kapoor daughter, the archies, khushi kapoor bollywood debut, sridevi, बोनी कपूर, खुशी कपूर, द आर्चीज, बोनी कपूर मुलगी, खुशी कपूर बॉलिवूड पदार्पण
मुलीच्या पदार्पणावर वडील बोनी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर यांची दुसरी मुलगी खुशी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून खुशी कपूर बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची पहिली झलक समोर आली. त्यानंतर चित्रपटाबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. आता मुलीच्या पदार्पणावर वडील बोनी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी दिवंगत पत्नी श्रीदेवी यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.

खुशी कपूरच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलताना बोनी कपूर म्हणाले, “मुलांना सुरुवातीपासून माहीत नसतं की त्यांना भविष्यात काय करायचं आहे. ते कधी सांगतात की मॉडेलिंग करायचं आहे तर कधी काही वेगळं. त्यांच्या आवडी-निवडी नेहमीच बदलत राहतात. अखेर वयाच्या १९-२० व्या वर्षी त्यांना काय करायचं आहे हे समजतं. ग्लॅमर आणि स्टारडम कोणाला आवडणार नाही. जगातल्या कोणात्याही व्यक्तीला हे आवडतंच. मग ते मनोरंजन क्षेत्राशी संबंधीत असो किंवा मग इतर कोणत्याही क्षेत्राशी.”

आणखी वाचा- साउथ- बॉलिवूड वादानंतर सलमान खान हिंदी भाषेत प्रदर्शित करणार किच्चा सुदीपचा चित्रपट!

बोनी कपूर म्हणाले, “जेव्हा २०१८ मध्ये जान्हवीने ईशान खट्टरसोबत ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं तेव्हाच खुशीनं देखील अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. जान्हवीचा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी श्रीदेवी यांचं निधन झालं. त्या आपल्या मुलीला मोठ्या पडद्यावर काम करताना पाहू शकल्या नाहीत. मात्र जान्हवीच्या निर्णयाला नेहमीच त्यांचा पाठिंबा होता. आज त्या या जगात असत्या तर त्यांनी खुशीच्या बाबतीतही असंच केलं असतं.”

आणखी वाचा- “पवार साहेबांच्या पायापर्यंत नाही आणलं ना तर…” केतकी चितळे प्रकरणावर सविता मालपेकर यांची संतप्त प्रतिक्रिया

खुशी कपूरबद्दल बोलताना वडील बोनी कपूर म्हणाले, “जेव्हा खुशीनं अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी २०१९ मध्ये मी तिला न्यूयॉर्क फिल्म स्कुलमध्ये पाठवलं. जर आज तिची आई असती तर तिने खुशीला पाठिंबा दिला असता.” दरम्यान बोनी कपूर यांचं पहिलं लग्न मोना शौरी यांच्याशी झालं होतं. त्या दोघांना अर्जुन आणि अंशुला ही दोन मुलं आहेत. त्यानंतर मोना यांना घटस्फोट देत त्यांनी श्रीदेवी यांच्याशी लग्न केलं. खुशी कपूरबद्दल बोलायचं तर तिचा ‘द आर्चीज’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Boney kapoor reacts on daughter khushi bollywood debut film the archies mrj

ताज्या बातम्या