scorecardresearch

#BoycottShahRukhKhan ट्विटरवर ट्रेंड, शाहरुखला दिली जाते चित्रपट फ्लॉप करण्याची धमकी

शाहरुखचा एक जुना फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर हे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

#BoycottShahRukhKhan ट्विटरवर ट्रेंड, शाहरुखला दिली जाते चित्रपट फ्लॉप करण्याची धमकी
शाहरुखचा एक जुना फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर हे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुखचे लाखो चाहते आहेत. त्याचे चाहते शाहरुखच्या ‘पठान’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, काही लोक शाहरुख विरोधात ट्वीट करत आहेत. त्यामुळे आज ट्विटरवर #BoycottShahRukhKhan हे हॅशटॅग ट्रेंड होत आहे. हे ट्वीट करत नेटकरी त्याला भारताचा शत्रू बोलत आहेत. शाहरुखचे काही जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

शाहरुख विरोधात असे ट्वीट का केले जात आहे या विषयी काही माहिती नसली तरी, लोक सतत त्याच्या विरोधात ट्वीट करत आहेत. नेटकरी सतत एक फोटो शेअर करत आहेत. या फोटोत शाहरुख पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत दिसत आहेत. हा फोटो खूप जुना आहे. या फोटोत शाहरुख आणि इमरान हसत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की शाहरुख भारतात राहत असला तरी तो पाकिस्तानच्या बाजुने आहे.

आणखी वाचा : मुलाच्या वाढदिवशी ट्विंकल खन्नाची खास पोस्ट, म्हणाली..

आणखी वाचा : नागा चैतन्य आणि साई पल्लवीच्या ‘लव्ह स्टोरी’ वर समांथा म्हणाली…

इमरान यांच्यासोबत हा फोटो व्हायरल झाल्यानंतर शाहरुखचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तो पाकिस्तानी क्रिकेटर्सची स्तुती करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत नेटकरी शाहरुखचा आगामी चित्रपट ‘पठान’ला फ्लॉप करण्याची धमकी देत आहेत. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की ते कोणत्याही परिस्थितीत ‘पठान’ हा चित्रपट पाहणार नाही.

‘पठान’ या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्मस करणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत. तर पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर शाहरुख आणि जॉनची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच संपणार आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-09-2021 at 13:20 IST

संबंधित बातम्या