बॉईज सिरीजने प्रेक्षकांना जणू वेडच लावले आहे. ‘बॉईज ३’ चित्रपटाची अख्खा महाराष्ट्र वाट पाहत आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात एक मनोरंजनाचा डोस घेऊन पुन्हा एकदा आलीय ‘बॉईज ३’ची टीम. ‘मनात शिरली’, ‘मस्त मौला’, ‘लग्नाळू २.०’ ह्या धमाल गाण्यांनंतर आता नुकतेच ‘चांद माथ्यावरी’ हे प्रमोशनल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अवधूत गुप्तेनी महाराष्ट्राला आणि मराठी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक अशी दर्जेदार गाणी दिलेली आहेत. त्यांची गाणी वाजली की टाळ्या, शिट्ट्या वाजल्याच पाहिजे. असाच एक ठेका धरायला लावणार ‘चांद माथ्यावरी’ हे गाणं प्रदर्शित झाले असून हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहे.

जितेंद्र जोशी यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला अवधूत गुप्ते यांचा रांगडा आवाज आणि संगीत लाभलेलं आहे. कमाल अश्या हुकस्टेप असणाऱ्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे आणि संजीव हौलदार यांनी केलेले आहे. सर्व सोशल मिडियावर या गाण्याची चलती पाहायला मिळत आहे. या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात,” प्रेक्षकांचा मिळणारा तुफान प्रतिसाद मला नेहमीच एक नवी ऊर्जा देतो. ‘चांद माथ्यावरी’ हे प्रमोशनल गाणं सर्व प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी अशा करतो. ‘बॉईज ३’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक जितके उत्सुक आहेत तितकाच मी सुद्धा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्यासाठी उत्सुक आहे.”
आणखी वाचा- पाकिस्तानी क्रिकेटरसह उर्वशीने शेअर केला रोमँटीक व्हिडीओ, नेटकरी म्हणतात…

ghorpade ghat pune history
Video: ऐतिहासिक घोरपडे घाट…जुन्या पुण्याची गोष्ट सांगणारा अमूल्य वारसा!
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ३’ चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. येत्या १६ सप्टेंबरला ‘बॅाईज ३’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.