‘ब्रॅडचं दारूचं व्यसन आणि जळफळाट यामुळे आमचा घटस्फोट’

अँजेलिना जोली या अभिनेत्रीने स्पष्ट केलं घटस्फोटामागचं कारण

एक काळ होता की ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली हे हॉलिवूडमधलं एक हॉट कपल मानलं जात होतं. त्या दोघांचं प्रेम, लग्न त्यांनी दत्तक घेतलेली मुलं हा सगळाच चर्चेचा विषय ठरला होता. हे दोघे रिल लाईफमध्ये जसे शोभून दिसायचे तसेच ते रिअल लाईफमध्येही दिसायचे. मात्र या दोघांचा घटस्फोट झाला आणि सगळ्यांनाच काहीसा धक्का बसला. आता अँजेलिना जोलीने घटस्फोटामागचं कारण सांगितलं आहे. ब्रॅडचं वाढतं दारूचं व्यसन आणि माझ्याबद्दल वाटणारा जळफळाट यामुळे आमचा घटस्फोट झाला असे अँजेलिनाने म्हटले आहे.

२०१४ मध्ये या दोघांचा विवाह सोहळा फ्रान्समध्ये मोठ्या दिमाखात साजरा झाला होता. मात्र त्यांचं नातं जेमतेम दोन वर्षेच टीकलं कारण २०१६ मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. या घटस्फोटानंतर ब्रॅड पिटने केलेली एक पोस्टही चांगलीच व्हायरल झाली होती. अँजेलिना जोलीने आता घटस्फोटामागचं कारण सांगितलं आहे. या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय का घेतला त्याचं कारण अद्याप या दोघांपैकी कोणीही सांगितलेलं नव्हतं. मात्र आता अँजेलिनाने एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत ब्रॅड पिटला लागलेल्या व्यसनाचा उल्लेख करत तेच आमच्या घटस्फोटाचं कारण होतं असं म्हटलं आहे.

‘मिस्टर अँड मिसेस स्मिथ’, ‘बाय द सी’ या आणि अशा अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यांची जोडी प्रेक्षकांना भावत असे. या दोघांचे लग्न होईल अशी चर्चा चांगलीच रंगली होती. त्यानंतर त्यांचं लग्न झालंही मात्र ते फार काळ टीकलं नाही. आता या दोघांच्या घटस्फोटामागचं कारण समोर आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Brads alcohol addiction jealousy became problem says angelina jolie on divorce

ताज्या बातम्या