सध्या ‘बॉयकॉट’ हा ट्रेंड चांगलाच व्हायरल होत आहे. आमिर आणि अक्षयसारख्या सुपरस्टारचे सिनेमे लोकांनी बॉयकॉट केले. आता नेटकरी येणाऱ्या इतरही मोठ्या स्टार्सच्या आणि स्टारकिड्सच्या चित्रपटांना बॉयकॉट करताना दिसत आहे. शाहरुखचा ‘पठाण’, हृतिकचा ‘विक्रम वेधा’, सलमानचा ‘टायगर ३’ या चित्रपटांना बॉयकॉट करायची मागणी होऊ लागली आहे. अशातच आता ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ हा ट्रेंड काही दिवसांपासून ट्विटर तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होऊ लागला आहे.

पुढच्या महिन्यात म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट सिनेगृहात प्रदर्शित होणार आहे. या बॉयकॉट ट्रेंडमुळे सध्या निर्माता करण जोहर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी हे चिंतेत आहेत. पॅन इंडिया स्केलवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने याकडून दोघांनाही खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटाची स्टारकास्ट सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता फक्त चित्रपटाची प्रतीक्षा आहे.

Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?

कमल हासन यांच्यानंतर ‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता साकारणार तब्बल २५ भूमिका

नुकतच एका कार्यक्रमादरम्यान रणबीरने या चित्रपटाबद्दल चर्चा केली. तो म्हणाला की ‘जेव्हा एखादा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा उत्कंठासोबतच भीतीची भावना देखील असते. विशेषत: अशा चित्रपटासाठी कारण तो बनवण्यासाठी आम्ही खरोखरच आमचे आयुष्य दिले आहे. त्यामुळे दबाव अधिक आहे. आम्ही प्रेक्षक हाच राजा मानतो. त्याला कोणी प्रश्न विचारू शकत नाही’. रणबीर कपूर पुढे म्हणाला, “चित्रपट जागतिक बनतो ते यातील कन्टेन्टमुळे. आम्हाला साथ देणारे अनेक लोक आहेत. राजामौली सर हा चित्रपट चार दक्षिण भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करत आहेत. आमचा विश्वास आहे की आम्ही एक चांगला चित्रपट बनवला आहे आणि आशा आहे की प्रेक्षकांना या आशयाचा आनंद मिळेल.”

चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन अशी दिग्गज मंडळी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटातली २ गाणी प्रदर्शित झाली असून त्यातलं ‘केसरिया’ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याची झलकदेखील बघायला मिळणार आहे.