अयान मुखर्जीचा बिग बजेट चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. बॉयकॉट ट्रेंडच्या दरम्यान हा चित्रपट हिट व्हावा यासाठी बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंतच्या कलाकारांनी कंबर कसली आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट उत्तर भारतात चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. त्याआधी त्यांनी दक्षिणेत एसएस राजामौली आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासह प्रमोशन केलं होतं. दरम्यान, एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक वेळ अशी आली होती जेव्हा अमिताभ बच्चन चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीवर भडकले होते.

‘ब्रह्मास्त्र’मध्ये अमिताभ बच्चन महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. तिचा लूकही सर्वांच्या पसंतीस पडला आहे. पण सध्या एक रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, शूटिंगच्या दिवसांमध्ये दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि करण जोहर यांना अमिताभ बच्चन यांचा राग सहन करावा लागला होता. समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार अयान मुखर्जी चित्रपटाच्या शूटिंग शेड्यूलमध्ये सतत बदल करत होता आणि त्यामुळे अमिताभ बच्चन नाराज झाले होते.
आणखी वाचा- ‘ब्रह्मास्त्र’ करणार का ‘लाल सिंग चड्ढा’पेक्षा जास्त कमाई? एका दिवसात विकली गेली ‘इतकी’ तिकिटं

रिपोर्टनुसार ‘हे असेच सुरू राहिल्यास ‘ब्रह्मास्त्र’ नुकसानकारक ठरू शकतो’ असं अमिताभ यांनी करण जोहरला सांगितलं होतं. अमिताभ बच्चन त्यांच्या शेड्यूलबाबत नेहमीच शिस्तबद्ध असतात आणि चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळापत्रकात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे ते खूश नव्हते. त्यांनी अखेर चिडून करण जोहरला सांगितले, “अयान आपला वेळ वाया घालवत आहे आणि आता तु सुद्धा या चित्रपटात पैसे गुंतवणं थांबव. कारण हे असंच चालू राहिलं तर हा चित्रपट फक्त नुकसानकारक ठरेल.” मात्र, आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल, अशी आशा अमिताभ बच्चन यांना आहे.

आणखी वाचा- “त्याला ‘ब्रह्मास्त्र’चा अर्थही माहीत नाही…” विवेक अग्निहोत्रींनी उडवली अयान मुखर्जीची खिल्ली

चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे, ज्यामध्ये या दोन कलाकारांव्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी राय हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित होणारा हा चित्रपट तीन भागांमध्ये येणार आहे, ज्याचा पहिला भाग ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून, या त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.