brahmastra box office collection alia bhatt ranbir kapoor movie croses 300 crores world wide karan johar shared special post | Loksatta

Brahmastra Box Office Collection : ३०० कोटींचा टप्पा पार करत ‘ब्रह्मास्र’ची यशस्वी घोडदौड; करण जोहर पोस्ट शेअर करत म्हणाला…

Brahmastra Box Office Collection : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेल्या ‘ब्रह्मास्र’ने वर्ल्ड वाइड ३०० कोटींचा गल्ला जमवला आहे.

Brahmastra Box Office Collection : ३०० कोटींचा टप्पा पार करत ‘ब्रह्मास्र’ची यशस्वी घोडदौड; करण जोहर पोस्ट शेअर करत म्हणाला…
एका आठवड्यात ‘ब्रह्मास्र’ने वर्ल्ड वाइड ३०० कोटींचा गल्ला जमवला आहे. (फोटो : IMDB)

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेला ‘ब्रह्मास्र’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. इतर बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच ‘ब्रह्मास्र’लाही बॉयकॉट ट्रेण्डचा सामना करावा लागला होता. परंतु, बॉक्स ऑफिसवर ‘ब्रह्मास्र’ची जादू कायम आहे. गेल्या आठवड्यात ९ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. एका आठवड्यात चित्रपटाने भारतात १७३.२२ कोटींचा गल्ला जमवला आहे.

‘ब्रह्मास्र’च्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदर्शनानंतर चित्रपटाने पहिल्याच वीकेण्डला भारतात १२४.४९ तर वर्ल्ड वाइड २२५ कोटींची कमाई केली. चित्रपटाने १६.५ कोटींचा गल्ला जमवत या आठवड्याची सुरुवात केली. परंतु, सोमवारनंतर चित्रपटाच्या कमाईत घट दिसून आली. त्यानंतर गुरुवारी ‘ब्रह्मास्र’ने ९.०२ कोटींचा गल्ला जमवला. आता वीकेंण्ड सोडून आठवड्यातील इतर दिवशीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा निर्मात्यांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >> आमिरचा भाऊ फैजल खानचं सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला “त्याचा खून…”

एका आठवड्यात ‘ब्रह्मास्र’ने वर्ल्ड वाइड ३०० कोटींचा गल्ला जमवला आहे. बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने एक व्हिडीओ ट्वीट करत ही माहिती दिली आहे.“’ब्रह्मास्त्र’ला मिळालेलं प्रेम आणि त्यातील ऊर्जेमुळे चित्रपट जागतिक बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. कृतज्ञता आणि उत्साहपूर्ण भावनेने दुसऱ्या आठवड्यात पदार्पण करत आहोत”, असं करणने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा >> नागा चैतन्य-समांथाच्या घटस्फोटावर नागार्जुन यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “माझा मुलगा आता…”

हेही वाचा >> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर करणार चित्रपटाचं दिग्दर्शन, पोस्ट शेअर करत म्हणाला…

बॉक्स ऑफिसवर या आठवड्यात कोणताही बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार नसल्यामुळे ‘ब्रह्मास्र’ला प्रेक्षकांकडून पसंती मिळण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या चित्रपटात आलिया-रणबीरसह बिग बी अमिताभ बच्चन, दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन, अभिनेत्री मौनी रॉय यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-09-2022 at 14:41 IST
Next Story
“माझी फसवणूक केली अन्…” बॉलिवूड निर्मात्याचे सनी देओलवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?