scorecardresearch

‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईचे आकडे खोटे म्हणणाऱ्या कंगना रणौतला मौनी रॉयचं सडेतोड उत्तर, म्हणाली…

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या कमाईचे आकडे खोटे म्हणणाऱ्य कंगना रणौतबाबत मौनी रॉयने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईचे आकडे खोटे म्हणणाऱ्या कंगना रणौतला मौनी रॉयचं सडेतोड उत्तर, म्हणाली…
'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या कमाईचे आकडे खोटे म्हणणाऱ्य कंगना रणौतबाबत मौनी रॉयने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्येच १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला. चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. एकंदरीतच चित्रपटाला अपेक्षेपेक्षा सिनेरसिकांनी अधिक पसंती दर्शवली. मात्र कंगना रणौतने ‘ब्रह्मास्त्र’चे नवीन आकडे समोर येताच वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईचे आकडे खोटे असल्याचं तिने म्हटलं होतं. आता ‘ब्रह्मास्त्र’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारलेल्या मौनी रॉयने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामध्ये मौनी रॉयने बॉलिवूडमधील टॉपच्या कलाकारांबरोबर कौतुकास्पद काम केलं. चित्रपटाला मिळालेल्या यशाबाबत मौनी फारच खूश आहे. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीमध्ये मौनी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाबाबत भरभरून बोलत होती. कंगनाने ‘ब्रह्मास्त्र’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन खोटं आहे असं म्हटलं होतं. यावर तुझं मत काय? असा प्रश्न मौनीला विचारण्यात आला.

मौनी रॉयचं कंगना रणौतला सडेतोड उत्तर
“नकारात्मक गोष्टींबाबत चर्चा न केलेलीच बरी.” असं मौनीने यावेळी उत्तर दिलं. तसेच कंगनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर ती फारसं बोलली नाही. मौनी सध्या ‘ब्रह्मास्त्र’ला मिळालेलं यश एण्जॉय करत आहे. यादरम्यान तिला कोणतेच नकारात्मक विचार करायचे नाहीत तसेच काहीच नकारात्मक बोलायचं नाही हे स्पष्टपणे दिसून येतं.

आणखी वाचा – शाहरुख खानच्या बायकोचा लेकाला रिलेशनशिपबाबत विचित्र सल्ला, म्हणाली, “लग्नापूर्वी पाहिजे तितक्या मुलींना…”

मौनीने ‘ब्रह्मास्त्र’मध्ये जुनून नावाची भूमिका साकारली होती. तिची या चित्रपटामधील भूमिका तसेच लूक प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. ‘ब्रह्मास्त्र’ने आतापर्यंत ३६० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचा दुसरा भागदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Brahmastra movie actress mouni roy reply to kangana ranaut says ignore negative thoughts see details kmd

ताज्या बातम्या