आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या ‘ब्रह्मास्त्रने’ पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने आणखी जबरदस्त कलेक्शन केले. ग्रॉस वर्ल्ड वाइड कलेक्शन, ७५ कोटी आणि दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन बघितले तर चित्रपटाने आतापर्यंत १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘ब्रह्मास्त्र’कडून इतक्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा कोणालाच नव्हती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवताना दिसत आहे. अयान मुखर्जीच्या साय-फाय ड्रामा चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास ३६ कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर झाली होती.

बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, ‘ब्रह्मास्त्र’ने दुसऱ्या दिवशी ४१.२५ ते ४३.१५ कोटी कमावले आहेत. यासह, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्व भाषांमध्ये ७९ कोटींची कमाई केली आहे. शनिवारी केवळ हिंदी व्हर्जनने ३७.५०कोटींचा व्यवसाय केला. ‘ब्रह्मास्त्र’ने हिंदीत दोन दिवसांत जवळपास ६९.५० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादावर अभिनेत्री आलिया भटने एक पोस्ट शेअर केली आहे. ‘प्रेक्षकांच्या मागणीखातर पीव्हीआर चित्रपटगृहाने रात्री उशिराचे दोन शो आयोजित केले आहेत. त्यातील एक शो रात्री २.३० ला तर दुसरा शो सकाळी ५.३० वाजता ठेवला आहे’.

बीफ व्हिडीओच्या स्पष्टीकरणानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी करण जोहरवर साधला निशाणा

आलिया आणि रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर एकीकडे बॉयकॉट ‘ब्रह्मास्त्र’ हा ट्रेंड सुरू आहे तर दुसरीकडे ब्रह्मास्त्र पाहायला लोकांची गर्दीदेखील दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच याविषयी नकारात्मक गोष्टी सोशल मीडियावर पसरवल्या जात होत्या.प्रेक्षक, समीक्षक यांच्या या चित्रपटाच्या बाबतीत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तसेच चित्रपटसृष्टीतल्या लोकांनीदेखील या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

ब्रह्मास्त्र हा या वर्षातील सर्वात मोठा प्रदर्शित झालेला चित्रपट मानला जात आहे. चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. ‘ब्रह्मास्त्र’चा पहिला भाग ‘शिवा’ प्रदर्शित झाला आहे. यानंतर चित्रपटाचे आणखी दोन भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.