brahmastra superstar nagarjuna on naga chaitanya and samantha ruth prabhu divorce says it unfortunate | Loksatta

नागा चैतन्य-समांथाच्या घटस्फोटावर नागार्जुन यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “माझा मुलगा आता…”

‘ब्रह्मास्र’ चित्रपटाच्या यशानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली. यावेळी त्यांनी नागा चैतन्य आणि समांथाच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे.

nagarjuna on samantha and naga chaitanya divorce
नागा चैतन्य आणि समांथा ऑक्टोबर २०२१मध्ये घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. (फोटो : नागार्जुन, समांथा/ फेसबुक)

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन ‘ब्रह्मास्र’ चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहेत. या चित्रपटात त्यांनी अनीश शेट्टी उर्फ नंदी अस्र ही भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या यशानंतर नुकतंच त्यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली. यावेळी त्यांनी नागा चैतन्य आणि समांथाच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे.

नागार्जुन यांना त्यांचा मुलगा अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समांथाच्या घटस्फोटाबद्दल विचारण्यात आले. यावर ‘पिंकवाला’ला उत्तर देत ते म्हणाले, “घटस्फोटानंतर माझा मुलगा खूश आहे, हे मला दिसत आहे. त्याच्याबरोबर घडलेला हा एक वाईट अनुभव होता. आता सगळं संपलं आहे. आपण आता याबद्दल चर्चा करणं योग्य नाही. आमच्या जीवनातून ही गोष्ट निघून गेली आहे. सगळ्यांच्याच आयुष्यातून ही गोष्ट निघून जाईल, अशी अपेक्षा आहे”.

हेही वाचा >> “देखो जरा अपनी मोहब्बत से दूर…”, उर्वशी रौतेलाची नवी पोस्ट पाहून नेटकऱ्यांना आठवला ऋषभ पंत

नागा चैतन्य आणि समांथा ऑक्टोबर २०२१मध्ये घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. घटस्फोटानंतर नागा चैतन्यने दोघांमधील नात्याबद्दल एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. “ आम्ही दोघेही एकमेकांचा खूप आदर करतो. तिच्याबद्दल माझ्या मनात कायम आदर राहील. त्याच गोष्टीवर बोलून मला कंटाळा आला आहे”, असं तो म्हणाला होता.

हेही वाचा >> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर करणार चित्रपटाचं दिग्दर्शन, पोस्ट शेअर करत म्हणाला…

नागार्जुन यांनी आता नागा चैतन्य-समांथाच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘ब्रह्मास्र’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. ट्रेलरपासूनच बॉयकॉट ट्रेण्डमध्ये अडकूनही चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहेत. तर बिग बी अमिताभ बच्चन, मौनी रॉय यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-09-2022 at 10:50 IST
Next Story
बिग बॉस फेम अभिनेत्री अक्षरा सिंगचा MMS Video झाला ऑनलाईन व्हायरल? चाहते म्हणतात “ही तर..