‘ब्रह्मास्त्र – पार्ट वन शिवा’ हा बिगबजेट चित्रपट येत्या शुक्रवारी ९ सप्टेंबरला जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल ४०० कोटी रुपये इतके असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे ‘ब्रह्मास्त्र’ भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला सर्वात महागडा चित्रपट बनला आहे. या चित्रपटाची घोषणा २०१७ मध्ये करण्यात आली होती. रणबीर कपूरसह चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी, करण जोहर, अपूर्व मेहता, नमित मल्होत्रा आणि मारिजके डिसूझा यांनी या बिगबजेट चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ ५ हजार भारतात, तर ३ हजार भारताबाहेर अशा ८ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे.

ब्रम्हास्त्रच्या आधी रणबीर कपूर, वाणी कपूर, संजय दत्त यांचा नुकताच आलेला ‘शमशेरा’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलाच आपटला. चित्रपटाचं जेवढं बजेट होतं तेवढी कमाईदेखील याने केली नसल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. शिवाय हा चित्रपट कॉपीराइटच्या वादात अडकल्याने चित्रपट प्रदर्शनानंतर यश राज फिल्म्स यांना १ कोटी रुपये इतका दंडदेखील भरावा लागला होता. ‘शेमशेरा’ चित्रपटातील कथा तितकी चांगली नव्हती हे खुद्द रणबीर कपूरने मान्य केले आहे.

जेव्हा डेव्हिड धवन यांनी शाहरुख खानला ‘या’ विनोदी चित्रपटासाठी विचारले होते

ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया- रणबीर फिरत होते. दिल्लीत प्रमोशन दरम्यान रणबीर कपूर म्हणाला की ‘शमशेरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही याचा अर्थ प्रेक्षकांना तो आवडला नाही. चित्रपट चालला नाही कारण कथा तितकी चांगली नव्हती’. चित्रपटगृहात फ्लॉप झाल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. यशराजच्या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

अभिनेता रणबीर कपूरने ‘शमशेरा’च्या निमित्ताने ४ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले होते. रणबीरची या चित्रपटात दुहेरी भूमिका होती. त्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटासाठी उत्सुक होते. या चित्रपटासाठी तब्बल १५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता.