‘कौन बनेगा करोडपती’या शोमध्ये आजवर अनेकांचं भाग्य उजळलं आहे. तर काहींच्या पदरी निराशादेखील पडली आहे. नुकत्याच पार पडलेल्या भागात पुण्यातील एक स्पर्धक करोडपती होण्याच्या टप्प्यावर होते मात्र नशीबाने त्यांना साथ दिली नाही. अगदी मोजक्या स्पर्धकांपैकी एक असलेले हुसैन वोहरा हे एक कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहचले होते. हुसेन यांनी ५० लाख रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत पुढील टप्पा गाठला. मात्र त्यांचा १ कोटी रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना गोंधळ उडाला.

हुसैनने यांना एक कोटी रुपयांठी बिग बींनी पर्वत शिखरांशी निगडीत एक प्रश्न विचारला होता. मात्र त्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर ठाऊक नसल्याने खेळ सोडला आणि ते ५० लाख रुपये जिंकले.

काय होता १ कोटी रुपयांसाठी विचारलेला प्रश्न?

आठ हजारी पर्वत शिखरांपैकी सर्वात कमी उंची कोणत्या शिखराची आहे शिवाय सर्वात कमी वेळा सर करण्यात आलंय?

A. नंगा पर्वत
B. अन्नपूर्णा
C. गाशरब्रुम १
D. शीशपंगमा

हुसैन यांना या प्रश्नाचं उत्तर येत नसल्याने त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शीशपंगमा शिखर. हे शिखर नेपाळच्या सीमेपासून पाच किलोमीटर अंतरावर दक्षिण-मध्य तिबेटमध्ये आहे. समुद्रसपाटीपासून ८, ०१७ मीटर उंचीवर असलेला हा जगातील १४वा सर्वात उंच पर्वत आहे.