ओळखा, या फोटोत आहेत चार बॉलीवूड सेलिब्रेटी

या ‘स्टारकिड्स’नी बॉलीवूडमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

बॉलीवूडच्या झक्कास हिरोच्या मुलीचा आज वाढदिवस आहे. ती लहान असताना काही वर्षांपूर्वी तिचे बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आले होते. या फोटोत तीन ‘स्टारकिड्स’ असून आता त्यांनी बॉलीवूडमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. अजूनही नाही ओळखलंत का? अर्जुन कपूरच्या या ट्विटमुळे तरी तुम्हाला नक्कीच कळेल की या फोटोमध्ये कोण कोण आहेत.


ओळखलंत ना.. यात बॉलीवूडचा झक्कास सुपरस्टार अनिल कपूर असून, त्याच्याकडे पाहत असलेला मुलगा रणबीर कपूर आहे. पिवळ्या रंगाच्या टीशर्टमध्ये अर्जुन कपूर असून केक खाण्यात व्यस्त असलेली मुलगी म्हणजे बॉलीवूडची स्टाइल दीवा सोनम कपूर आहे. तर केक कापत असलेली चिमुकली म्हणजे आजची बर्थडे गर्ल आणि अनिल कपूरची धाकटी मुलगी रिह्या कपूर आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Can you guess which bollywood celebrities are at this birthday party photo

ताज्या बातम्या