scorecardresearch

आधी कर्करोग आता गंभीर त्वचारोगाशी लढतेय प्रसिद्ध अभिनेत्री; पोस्ट शेअर करत म्हणाली, “मी माझा रंग…”

अभिनेत्री ममताने तिचे काही सेल्फी शेअर करत चाहत्यांना तिच्या आजाराबद्दल सांगितलं.

आधी कर्करोग आता गंभीर त्वचारोगाशी लढतेय प्रसिद्ध अभिनेत्री; पोस्ट शेअर करत म्हणाली, “मी माझा रंग…”
(फोटो – इन्स्टाग्राम)

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री कर्करोगानंतर आता आणखी एका गंभीर आजाराशी लढत आहे. अभिनेत्री ममता मोहनदासने तिच्या प्रकृतीबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे. तिने रविवारी तिचे काही सेल्फी शेअर करत चाहत्यांना तिच्या आजाराबद्दल सांगितलं. या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्याचा रंग बदललेला दिसत आहे.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये ममता मोहनदास बाहेर बसलेली दिसत आहे. तिच्या हातात एक कप आहे. तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट, टाइट्स आणि जॅकेट घातलं आहे. या फोटोंबरोबर तिने एक मोठं कॅप्शन दिलंय. “प्रिय सूर्या, मी आता तुला मिठी मारते, जशी मी यापूर्वी कधीच मारली नाही. चेहऱ्यावर बरेच डाग आहेत, मी माझा रंग गमावत आहे. मी सकाळी तुझ्या आधी उठते. धुक्यातून तुझे पहिले किरण निघताना पाहण्यासाठी. तुझ्याकडे जे काही आहे ते मला दे… मी तुझी ऋणी आहे. आजपासून कायमची,” असं कॅप्शन ममताने दिलंय. या फोटोंना तिने कलर, ऑटोइम्यून डिसिज, विटिलिगो आणि सनलाइट असे हॅशटॅग दिले आहेत.

दरम्यान, ममताच्या या फोटोंवर इंडस्ट्रीतील कलाकार आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करून तिला हिंमत ठेवण्यास सांगितलं आहे. ‘आज तक’ने यासंदर्भात वृत्त दिलंय.

“त्यांच्या निधनाला जिम…” राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूबद्दल चार महिन्यांनी लेक अंतराने सोडलं मौन

ममताला झाला होता कर्करोग

ममता मोहनदास ही मल्याळम अभिनेत्री असून कॅन्सर सर्व्हायव्हर आहे. काही वर्षांपूर्वी तिचा कर्करोग परत आला होता. त्यानंतर तिने अमेरिकेत उपचार घेतले होते. २०१४ मध्ये एका मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं होतं.”मी असं म्हणू शकत नाही की मी या आजारापूर्वी जितकी मजबूत होते, तितकी आज आहे. आधी मी कशाचीही चिंता करायचे नाही. कोणतीही समस्या असली तरी मी घाबरायचे नाही. पण आयुष्यात पहिल्यांदाच मी घाबरले. सकारात्मक राहा, हे सांगणं सोपं आहे. पण आत्ता मला वाटतं की घाबरलेलं असायला काहीच हरकत नाही,” असं ममता म्हणाली होती.

विटिलिगो आजार नेमका काय आहे?

विटिलिगो हा एक त्वचेसंदर्भातला आजार आहे. यामध्ये पीडितेच्या त्वचेचा रंग उडू लागतो. तिच्या शरीरावर पांढरे डाग दिसू लागतात आणि ते कालांतराने वाढतात.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 08:19 IST

संबंधित बातम्या