माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. अमृता फडणवीस सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. ट्विटरवरून त्या नेहमीच सामाजिक तसेच राजकीय मुद्द्यांवर आपलं मत मांडताना दिसतात. राजकारणासोबत अमृता फडवीस यांना कलेची देखील आवड आहे. त्या स्वतः एका गायिका असून आतापर्यंत त्यांची बरीच गाणी रिलीज झाली आहेत. अमृता फडणवीस आता ७५ व्या कान्स चित्रपट महोत्सवासाठी पोहोचल्या आहेत.

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटरवरून याची माहिती दिली. कान्स चित्रपट महोत्सवासाठी पोहोचलेल्या अमृता फडणवीस यांचं हे ट्वीट सध्या बरंच व्हायरल झालं आहे. त्यांनी स्वतःचा एक फोटो शेअर करताना आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, “कान्समध्ये पोहोचले कान्स चित्रपट महोत्सव २०२२साठी आणि बेटर वर्ल्डसाठी…” अमृता फडणवीस यांचं हे ट्वीट आणि त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. युजर्स त्यांच्या या ट्वीटवर कमेंट करताना दिसत आहेत.

आणखी वाचा- “त्यावेळी सगळं प्रमोशनसाठी नव्हतं…” सारासोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला कार्तिक आर्यन

दरम्यान आंतरराष्ट्रीय स्थरावर मानाचा मानला जाणारा कान्स चित्रपट महोत्सव १७ मे पासून सुरू झाला आहे. यंदाचा हा ७५वा कान्स चित्रपट महोत्सव २८ मे पर्यंत असणार आहे. या चित्रपट महोत्सवात वेगवेगळे कार्यक्रम देखील राबवले जाणार आहेत. त्याचबरोबरीने सहा भारतीय चित्रपटांना कान्स चित्रपट महोत्सवामध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. या सहा चित्रपटांमध्ये मराठी चित्रपटांचा समावेश आहे. पोटरा’ (Potra), ‘कारखानीसांची वारी’ (Karkhanisanchi Wari) आणि ‘तिचं शहर होणं’ (Ticha Shahar Hona), ‘गोदावरी’ (Godavari) या चित्रपटांनी कान्स चित्रपट महोत्सवामध्ये मानाचं स्थान मिळवलं आहे.

आणखी वाचा- “मागच्या ४ वर्षांत एका रुपयाचीही कमाई नाही कारण…” आर माधवनचा मोठा खुलासा

७५व्या कान्स चित्रपट महोत्सवासाठी ८ सदस्यीय ज्युरींमध्ये दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली आहे. चित्रपट महोत्सवात दीपिका ज्युरी म्हणून सध्या काम पाहत आहे. यासोबतच भारतला कान्स चित्रपट महोत्सवामध्ये पहिल्यांदाच ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मान मिळाला आहे. तसेच सत्यजित रे यांचा ‘प्रतिद्वंदी’ हा चित्रपट यंदा कान्स चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे. या चित्रपट महोत्सवात १९ मे ला आर माधवनच्या ‘रॉकेट्री : द नम्बी इफेक्ट’चं स्क्रिनिंग पार पडलं होतं.