बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट २०२५ च्या कान्स फिल्म फेस्टिवलमधील पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. शुक्रवारी २३ मे रोजी सकाळी आलिया ‘कान्स’ला जाण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींनी अभिनेत्रीला बॉसी लूकमध्ये पाहिले.
काही दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भट्ट तिचा डेब्यू अपिअरन्स रद्द करू शकते, अशा अफवा पसरल्या होत्या. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट शुक्रवारी सकाळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसली. ती सध्या सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिवल २०२५ मध्ये पदार्पण करण्यासाठी रवाना झाली आहे.
आलिया भट्टने स्कूप्ड नेकलाइन आणि सिग्नेचर हिरव्या व लाल रंगाच्या पट्ट्यांसह गुची टँक टॉप निवडला, ज्याची किंमत ५९,४५२ रुपये आहे. आलिया भट्टने तिचा लूक ऑलिव्ह रंगाच्या गुची मॅक्सी शोल्डर बॅगने पूर्ण केला, ज्यामुळे तिच्या आउटफिटमध्ये एक बोल्ड कॉन्ट्रास्ट जोडला गेला होता. या लक्झरी आर्म कँडीची किंमत सुमारे ३,००,००० रुपये आहे. आलिया भट्ट बॉसी लूकमध्ये स्मार्ट दिसत होती. काळ्या सनग्लासेसने तिच्या लूकमध्ये भर घातली. उघड्या केसांनी आणि कमीत कमी मेकअपने ती खूप सुंदर दिसत होती.
आलियाचे ‘कान्स’ला जाणे तिच्या चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का होता. कारण- काही दिवसांपूर्वी अशी अटकळ होती की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये सुरू असलेल्या तणावानंतर ती भारताबरोबर एकता दर्शविण्यासाठी फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होणार नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया लॉरियलची अॅम्बेसेडर म्हणून ‘कान्स’मध्ये पदार्पण करणार होती आणि ती भव्य उद्घाटनालाही उपस्थित राहणार होती; परंतु भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावामुळे तिला देशाबरोबर एकता दर्शवायची होती. म्हणून तिने न जाण्याचा निर्णय घेतला होता.
आलियाने इन्स्टाग्राम स्टोरीजवर तिच्या कान्स पदार्पणाबद्दल आनंद व्यक्त केला. तिने तिच्या गुची बॅगचा फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये पुस्तके आणि ब्यूटी प्रॉडक्ट्सने भरलेली बॅग होती, ज्यावर लिहिले होते, ‘आय एम वर्थ इट’. फोटो शेअर करताना तिने लिहिले, ‘आम्ही जातो… ‘ त्याशिवाय,आलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कॉफीचा फोटोदेखील शेअर केला आहे.
करण जोहर, ऐश्वर्या राय, कियारा अडवाणी आणि इतर अनेक भारतीय सेलिब्रिटींनी या वर्षी त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी आणि इतर कारणांसाठी कान्स चित्रपट महोत्सवात आधीच हजेरी लावली आहे.