रुजुता दिवेकर यांचा पुरस्कारासंदर्भात मोठा गौप्यस्फोट; कंगनानेही केलं त्यांच्या हिंमतीचं कौतुक

रुजुता यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिल्यानंतर अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

kangana ranaut, rujuta diwekar,
रुजुता यांच्या पोस्टनंतर कंगनाने दिला पाठिंबा

सेलिब्रिटी न्युट्रिशिअनिस्ट रुजुता दिवेकर नेहमीच आपल्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे या विषयी सांगताना दिसतात. रुजुता दिवेकर या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या नेटकऱ्यांना निरोगी राहण्यासाठी कोणत्या गोष्टींचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे ते सांगताना दिसतात. मात्र, रुजुता यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांना पुरस्कार पाहिजे असेल तर अडीच लाख रुपये भरण्यास सांगितल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे.

रुजुता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. “एका मीडिया एजन्सीने मला प्रेरणादायी महिला म्हणून पुरस्कार देणार असल्याचे सांगितले. त्यासाठी मला फक्त एक फॉर्म भरावा लागेल आणि २ लाख ५० हजार रुपये भरावे लागतील,” असे त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले आहे. तर ही पोस्ट शेअर करत “गेल्या तीन वर्षात १०० पेक्षा अधिक पुरस्कारांच्या ऑफर मला मिळाली. प्रेरणादायी स्त्रीपासून ते अग्रगण्य पोषणतज्ज्ञ ते जागतिक आरोग्य तज्ञ इत्यादी. टीव्हीवर थोडावेळ दिसण्यासाठी, मॅग्झिनच्या कव्हरसाठी, वर्तमानपत्रात आणि बऱ्याच गोष्टी या सगळ्यांची एक किंमत ठरलेली असते. बहुतेक पुरस्कार हे एक व्यवसाय म्हणून दिले जातात,” असे कॅप्शन रुजुता दिवेकर यांनी दिले आहे.

आणखी वाचा : शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील ‘या’ आलिशान रेस्टॉरंटमध्ये असते बॉलिवूड कलाकारांची रेलचेल!

त्यांची ही पोस्टा पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर कमेंट केल्या आहेत. यापैकी एक कमेंट ही बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत आहे. कंगनाने ही रुजुता यांना पाठिंबा देत त्यांचे कौतुक केले आहे. “मी खूप आधीच चित्रपट पुरस्कारांवर बहिष्कार टाकला आहे, मला आनंद आहे की तुम्ही सगळ्या स्त्रीयांच्यावतीने अशा फसवणुक करणाऱ्यांच्या विरोधात पुढे आला आहात,” अशी कमेंट कंगनाने त्यांच्या पोस्टवर केली आहे.

आणखी वाचा : प्रियांका अमेरिकावासियांना खाऊ घालतेय ‘मुंबईचा वडापाव’, किंमत ऐकून पळून जाईल भूक

रुजुता या एक लेखक आहेत. त्यांनी फिटनेसवर अनेक पुस्तक लिहिली आहेत. रुजुता नेहमीच आपल्या घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून लोकांना व्यायाम करण्यास सांगतात. त्यासोबतच त्या अनेक रिसेपी आणि कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या भाज्या आणि फळे खाल्याने आपल्याला फायदा होईल हे देखील सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Celebritie nutritionist rujuta diwekar says media agency offered her award for money practice and kangana ranaut supports her dcp

फोटो गॅलरी