यंदा भारत आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेला सगळीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही या मोहिमेला पाठिंबा दर्शवत आहेत. आतापर्यंत अनेक स्टार्सनी त्यांचा प्रोफाइल फोटो बदलून तिरंग्याचा फोटो ठेवला आहे. तसेच काहींनी आपल्या घरच्या बाल्कनीत आपला राष्ट्रध्वज फडकवला आहे.

आणखी वाचा : लेखक सलमान रश्दींवर प्राणघातक हल्ला, बॉलिवूड कलाकारांनी व्यक्त केला संताप

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश

सध्या अभिनेता आमिर खान त्याच्या लाल सिंग चढ्ढा या चित्रपटामुळे तूफान चर्चेत प्रचंड आहे.  अशा परिस्थितीत त्याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आमिर खान त्याची मुलगी इरा खानसोबत घराच्या बाल्कनीत उभा आहे आणि त्याच्या बाल्कनीत तिरंगाही फडकताना दिसत आहे. त्याच्या या फोटोतून तो ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला पाठिंबा देत असल्याचे सिद्ध झाले आहे.

अलीकडेच, अभिनेता अक्षय कुमारने त्याचा प्रोफाइल फोटो म्हणून तिरंग्याचा फोटो लावत लिहिले,  ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. अभिमानाने ‘हर घर तिरंगा’ फडकवण्याची वेळ आली आहे. 

आणखी वाचा : “भारतीयत्वाची भावना माझ्या मनातही प्रबळ आहे आणि…” गायक राहुल देशपांडेचं ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर

याशिवाय तेलुगू सुपरस्टार महेश बाबू यांनीही हर घर तिरंगा मोहिमेला पाठिंबा देत ट्विट केले. ट्विटमध्ये त्याने लिहिले, ‘आपला  तिरंगा… आपला अभिमान. १३  ते १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक घराघरात आपण आपला तिरंगा फडकवत ठेवण्याची शपथ घेऊया.’

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर तिरंग्याचा फोटो ठेऊन ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला पाठिंबा दिला आहे. 

या मोहिमेला पाठिंबा देणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेता आर माधवनचाही समावेश आहे. त्याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरही ट्विट केले आणि लिहिले की, ‘आपण स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात पदार्पण करत असताना, आपला झेंडा उंच ठेवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या बलिदानाला आपण विसरता कामा नये. त्यांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी, चला तिरंगा घरी आणूया आणि १३ ते १५  ऑगस्ट तो अभिमानाने फडकवूया.’

मनोरंजन सृष्टी व्यतिरिक्त समाजसेवा, क्रीडा, व्यापार अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामवंत मंडळींही या मोहिमेला पाठिंबा देताना दिसत आहेत.